India vs Bharat Esakal
देश

India vs Bharat: 'इंडिया विरुद्ध भारत' वादावर बोलू नका, PM मोदींचा खासदारांना कानमंत्र; वादावर न बोलण्यासंबधी सांगितलं मोठं कारण

कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा कानमंत्र मंत्र्यांना दिल्याची माहिती आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारताचं नाव 'इंडिया म्हणजे भारत' असं असताना यातून 'इंडिया' हा शब्द वगळण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत G20 समिटदरम्यान, देशाच्या नावात काही बदलही करण्यात आले आहेत.

पण अचानक असा निर्णय घेण्यामागे विरोधकांची इंडिया आघाडी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. अशातच इंडिया विरुद्ध भारत' वादावर बोलू नका असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना दिला आहे.

कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा कानमंत्र मंत्र्यांना दिल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (बुधवारी) केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत 'इंडिया आणि भारत' वादावर बोलू नका, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना सांगितलं आहे.

त्याचबरोबर मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर योग्य ती प्रतिक्रिया द्यावी आणि सनातन धर्माबाबत वस्तुस्थिती सांगावी, असे सांगितले असल्याची माहिती आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

इंडिया भारतावर बोलल्याने मतांवर परिणाम होईल म्हणून सनातनचा मुद्दा आता महत्वाचा मानला जात आहे. G 20 मुळे अनेक देशांचे नेते भारतात येत असल्याने भारतीय वृत्तपत्र आणि माध्यमात इंडिया भारतचा वाद दिसतोय. त्यासाठी या विषयावर न बोलण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत G-20 संबधीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. बैठकी दरम्यान, G20 वर एक सादरीकरण देण्यात आले आहे. ज्यामध्ये G-20 समितीमध्ये 2 दिवस होणार्‍या सर्व कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT