Dr Ambedkar Jayanti sakal
देश

Dr Ambedkar Jayanti : सावरकरांच्या मते आंबेडकरांचे धर्मांतर म्हणजे त्यांची हिंदुराष्ट्रघातक महत्वाकांक्षा

"डॉ.आंबेडकरांची हिंदुराष्ट्रघातक महत्वाकांक्षा. " याच लेखातील काही संपादित भाग सावरकर या लेखात लिहितात...

सकाळ डिजिटल टीम

Dr Ambedkar Jayanti : बौद्ध धर्मियांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे, धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhamma Chakra Pravartan Din). दरवर्षी भीम अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा विजयादशमी दिवशी साजरा करतात. 

अशोक विजयादशमीचं औचित्य साधत 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पाच लाखांपेक्षा जास्त अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता.

हे धर्मांतर संपूर्ण भारत देशातील दिनदलित जनतेसाठी एका नव्या युगाची नांदी होती. त्याबद्दल तत्कालीन कर्मठ समाजाकडून या बद्दल अनेक उलट सुलट प्रतिक्रिया आल्या. त्यातीलच एक महत्वाची प्रतिक्रिया होती ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची.  (Dr Ambedkar Jayanti what is the reaction of veer savarkar on dr babasaheb ambedkar converted religion)

३० ऑक्टोबर १९५६ च्या एका दीपावली अंकात (पुरवणी, पा. १७-१८) स्वा. वीर सावरकर यांचा लेख छापला होता. लेखाच्या डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात बुद्ध लेण्याचे एक रेखाचित्र, त्याच्या उजव्या बाजूला आद्य शंकराचार्य यांचे रेखाचित्र देऊन हा लेख छापण्यात आला.  या लेखाचे शीर्षक होते  "डॉ.आंबेडकरांची हिंदुराष्ट्रघातक महत्वाकांक्षा. " याच लेखातील काही संपादित भाग  सावरकर या लेखात लिहितात,

गेल्या विजयदशमीला नागपूर येथे डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या उण्यापुऱ्या एक लक्ष अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बौद्ध धर्मात जाण्याची सिद्धता डॉ. आंबेडकर यांनी गेली सात आठ वर्षे तरी विशेषतः  महाराष्ट्रातील महारवाडयातून आणि त्यांच्या अनेक प्रचारकांकडून पद्धतशीरपणे चालविलेली होती.

ही वस्तुस्थिती ज्याना माहीत आहे त्यांना आंबेडकरांचे बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी एकगटी एक लक्ष अनुयायी नागपूरला एकत्र झाले त्यामुळे तितकेसे आश्चर्य वाटणार नाही. इतकेच काय पण काही बौद्ध धर्मीय परदेशातून आणि विशेषतः आज भारतीय शासनाच्या कारभाराची सूत्रे ज्यांच्या हाती पडलेली आहेत.

त्यातील पंतप्रधान नेहरू प्रभूति काही जणांकडून प्रत्यक्ष नि अप्रत्यक्षपणे धनादिक सर्व प्रकरणी सक्रिय पाठिंबा या बौद्ध धर्म प्रचाराच्या अभियानास मिळालेला असल्यामुळे आणि मिळणारा असल्यामुळे दोन एक वर्षांच्या आत भारतात दहा लक्ष लोकही बौद्ध धर्म स्वीकारतील असे आपणास समजून चाललेले पाहिजे.

चिंतनीय पण चिंताजनक नव्हे

काही लाख लोकांनी हिंदुधर्मातील सनातन किंवा वैदिक सांप्रदाय सोडून बौद्ध संप्रदायाचा स्वीकार करावा आणि तोही इतक्या गाजावाजाने नि संघटीतपणे करावा ही गोष्ट चिंतनीय आहेच आहे, परंतु त्यामुळे हिंदू राष्ट्रावर किंवा समाजावर कोणचा एखादा चिंताजनक प्रलय ओढावणार आहे अशी काहीशी जी भीति कित्येकांना आतून वाटते ती मात्र निराधार आहे.

डॉ. आंबेडकरांनी कितीही मोठ मोठ्याने गर्जून सांगितले की ते साऱ्या भारतांतून हिंदू धर्माचे आमूलाग्र उच्चाटन करून सर्व धर्मात श्रेष्ठअसा जो बुद्ध धर्म त्याची प्रस्थापना करणार आहेत तरी त्या त्यांच्या गरजण्याला क्रोधाविष्ट वल्गनांपेक्षा अधिक महत्व देण्याचे काही एक कारण नाही.

स्वतः बुद्ध भगवान हे त्यांनी धर्म स्थापल्यानंतर चाळीस वर्षे स्वतःच्या धर्माचा अखंड उपदेश करीत गेले असताही जेथे त्यांना सनातन धर्माचे उच्चाटन करता आले नाही; आणि अशोकासारख्या सम्राटाच्या राजशक्तीने त्या उच्चाटनासाठी सर्वस्व पणासलावले असताही शेवटी जेथे त्यांनाही थकून जाऊन हात टकावे लागले; तेथे डॉ. आंबेडकर यांची कथा काय? परंतु अशा चळवळीत जो राष्ट्रीय फुटीरपणा शिरण्याचा पुढेपुढे संभव असतो त्यास आपण प्रथमपासूनच पायबंद मात्र कटाक्षाने घालीत गेले पाहिजे.

एक सावधानतेची सूचना- बौद्ध स्थान-नि- नागराज्ये

डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या काही लाख अनुयायांसह जे संप्रदायानंतर किंवा पाहिजे तर त्यास धर्मातर म्हणा, केलेले आहे, ते बौद्ध धर्माविषयी त्यांच्या मनांत प्रमादभक्ति उत्पन्न झाली म्हणूनच कांही केवळ केलेले नाही. त्यांच्या मनाच्या एका अंधारी कप्यांत आणखी एक हिंदु राष्ट्र घातक राजकीय महत्वाकांक्षा दडून बसलेली आहे.

ती हीच की त्यांना स्वताच्या पीठाचार्यात्वाखाली जर भारतात अवश्य तितके बौद्धांचे संख्याबळ वाढवता आले तर झारखंडादिक इतर फुटीर प्रवृत्तीच्या समूहाशी हातमिळवणी करून शक्य होतांच एक स्वतंत्र बौद्ध स्थान, एक स्वतंत्र नागराज्य स्थापन करावयाचे आहे. ह्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेची शंका येण्याचे कारण त्यांचीच त्यांच्या अनुयायांपुढे दिलेली भाषणे त्यांच्या स्वतःच्या संपादकात्वाखाली प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्यात त्यांनी व्यक्त केलेले विचार हेच होत.

या प्रकरणी सध्या आम्ही इतकीच चेतावणी आमच्या हिंदु राष्ट्रास देऊ इच्छितो की, ह्या आंबेडकरी धर्मातराचे कोणीही आंधळे कौतुक करू नये. प्रथम प्रथम बॅ. जीना ह्यांना राष्ट्रीय मुसलमान म्हणून काँग्रेसने कौतुकाने कवटाळले नव्हते का? पाकिस्तानची योजना पहिल्यांदा पुढे आली तेव्हा याच नेहरूंनी तिला (Fantastic Nonsense) म्हणून हेटाळली नव्हती का? तसल्या बावळटपणाच्या नि आंधळेपणाच्या चुका पुन्हा तरी घड्डू नयेत, म्हणून अशा धर्मातरासारख्या कोणत्याही फुटीर चळवळींविषयी प्रथमपासूनच ढिलेपणाच्या संभ्रमें राहोंची नये !

संदेहात्मक संकट असे समजून तिचा विरोधच केला पाहिजे. त्यांतही जेव्हां बुद्धाच्या अस्थि उकरून काढून परदेशाहून आणून कांही राज्य धुरंधर लोकही त्यांना डोक्यावर घेऊन मिरवू लागले आहेत. तेंव्हा ह्या वाढत्या बुद्धप्रस्थांची धार्मिक नि राष्ट्रीय दृष्टिनेही आम्हाला चिकित्सा केलीच पाहिजे.

त्यांनीच पुन्हा उघडलेल्या त्या बुद्ध काळाच्या इतिहासास पुन्हा एकदां वाचले पाहिजे कीं अगदी यवन, शक, कुशाण, हूणादिक परकीय आक्रमणापासून तो मुसलमानांच्या स्वाऱ्यांपर्यंत, कुलांगार जयचंद सारख्या फुटकळ व्यक्तींनी स्वार्थाच्या अधम लोभापायी नव्हे तर समुहशः धार्मिक कर्तव्य समजून भारतीय बौद्धांनी त्या परकीय म्लेच्छ व्यक्तीशी हातमिळवणी करण्याचा नि तीं तीं ग्लेंच्छ राज्ये भारतात स्थापण्याचा हिंदुराज्यद्रोह पुन्हा पुन्हा केलेला आहे!

त्याच त्यांच्या पापाने पेटलेल्या भारतीय क्रोधाच्या प्रचंड यज्ञाग्नीत मागच्या बुद्धप्रस्थाचा बळी पडून भारतांतून बुद्ध धर्म पूर्वी नामशेष झाला होता! पुढे मागे तसे काही घडण्याचा संभव आज जरी निश्चितार्थी दिसत नसला तरी हिंदुराष्ट्राच्या हितशत्रूंच्या या बौद्ध उठावाविषयी अखंड सावधान असावे हेच उत्तम. विष पिऊन मग त्याची परीक्षा पहात बसण्यापेक्षा तें मुळातच न प्यालेले बरे!"

संदर्भ- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड-१२ लेखक चां. भ. खैरमोडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT