DRDO Espionage Case  
देश

DRDO Espionage Case : कुरूलकरला पुन्हा ATS कोठडी! एअरफोर्स अधिकाऱ्यासाठी देखील लावण्यात आलेला हनीट्रॅप?

रोहित कणसे

DRDO espionage case : हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या अरोपाखाली अटकेत असलेले आरोपी डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ प्रदीप कुरुलकर यांना पुण्यातील विशेष एटीएस न्यायालयाने उद्यापर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज या प्रकरणात मोठी नवी अपडेट समोर आली आहे.

याप्रकरणात आज, १५ मे रोजी एक एअरफोर्स अधिकाऱ्याचे स्टेटमेंट कोर्टासमोर नोंद करून घेण्यात आले. महत्वाचे म्हणजे या, अधिकाऱ्यांला देखील फेसबुकवरून संपर्क साधत कुरुलकरांशी संपर्क साधण्यासाठी वापरला होता त्याच IP वरून कॉल देखील करण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे.

यानंतर प्रदीप कुरुलकरांसह वायुदलातील अधिकारीही पाकिस्तानच्या संपर्कात होता ही माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वायुदलातील अधिकारी निखील शेंडें हे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात होते असे एटीएसच्या तपासात समोर आले. ज्या आयपी अड्रेसवरून प्रदीप कुरुलकर यांच्याशी संपर्क साधला गेला, तोच आयपी अड्रेस बंगळूरू येथे तैनात शेंडे या वायुदलातील अधिकाऱ्याशी संपर्क करण्यासाठी वापरला गेला होता.

दरम्यान ही माहिती समोर आल्यानंतर वायुदलातील अधिकाऱ्याची एटीएसकडून चौकशी करण्यात आली . तसेच त्यांचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे. दरम्यान नौदलाकडून देखील या अधिकाऱ्याची स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. मात्र या प्रकरामुळे प्रदीप कुरुलकर यांच्यासोबतच भारतीय सेनादलातील इतरही अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे.

प्रकरण काय आहे?

महाराष्ट्र एटीएसच्या पुणे युनिटने गेल्या आठवड्यात शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. ते हनीट्रॅपमध्ये अडकले असल्याचे महाराष्ट्र एटीएसच्या तपासात उघड झाले आहे की, कुरुलकर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होते, परंतु तिला कधीही भेटले नाहीत.

पण ते डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना भेटत असत. दरम्यान एटीएसला कुरुलकर आणि पाकिस्तानी गुप्तहेर यांच्या अनेक व्हॉट्सअॅप चॅट्स मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT