आयपीएलचा १४ हंगाम सध्या दुबईमध्ये सुरू असून, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सध्या फक्त आणि फक्त आयपीएलची चर्चा सुरू आहे. आयपीएलसोबत आणखी एक गोष्ट चर्चेत आहे, ती म्हणजे 'ड्रीम 11' हे अॅप्लिकेशन. मात्र आता ड्रीम 11 वापरणाऱ्यांसाठी एक चिंतेची बाब समोर आली आहे. ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणाऱ्या नवीन स्थानिक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कर्नाटकमध्ये या ड्रीम 11 अॅपवर एफआयआर दाखल झाला आहे. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर कर्नाटकमध्ये ड्रीम ११ ने सेवा बंद केल्याची माहिती इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे,
कर्नाटकमध्ये या आठवड्यात अंमलात आलेला कायदा, सट्टेबाजी आणि तत्सम खेळांना, म्हणजेच आर्थिक जोखीम असलेल्या खेळांना परवानगी देत नाही. सेक्वॉया कॅपिटल, मोबाईल प्रीमियर लीगसह अनेक गेमिंग अॅप्सने राज्यातील युजर्सला सेवा देणे बंद केले आहे, परंतु ड्रीम ११ हे अॅप्लीकेशन सुरूच होते.
भारताची तंत्रज्ञान राजधानी असलेल्या कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये 42 वर्षीय कॅब ड्रायव्हरच्या तक्रारीनंतर ड्रीम 11 च्या संस्थापकांविरोधात शनिवारी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर ही "तक्रार हेतुपुरस्कर रित्या केली असावी अशी माहिती ड्रीम ११ने रॉयटर्सला दिली आहे.
कंपनी त्याच्या कायदेशीर उपायांची चाचपणी करत असल्याचं देखील समजतं आहे. "आम्ही एक जबाबदार, कायद्याचे पालन करणारी कंपनी आहोत आणि कोणत्याही अधिका-यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू" कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ड्रीम ११ वापरकर्त्यांची चिंता वाढले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.