लखनऊ - जगभर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हाहाकार माजला असून काही देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यातच आता ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील बलिया इथं बहुजन समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष भीम राजभर यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी अजब असा उपाय सांगितला आहे.
भीम राजभर यांनी म्हटलं होतं की, ताडी प्यायल्यानं कोरोना होणार नाही. एवढंच नाही तर राजभर यांनी गंगा नदीच्या पाण्यापेक्षाही ताडीचा थेंब पवित्र असल्याचं वक्तव्य केलं होतं. बसपाचे प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा बलिया इथं भीम राजभर गेले होते.
बसपा आमदार उमाशंकर सिंह यांनी त्यांच्या अभिनंदनासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा राजभर म्हणाले की, समाज असं मानतो की गंगेच्या पाण्यापेक्षा ताडी पवित्र आहे. ताडीमध्ये इम्युनिटी पॉवर आहे आणि ती प्यायल्यानं कोरोना होणार नाही.
जे लोक खूप ताडी पितात त्यांना कोरोना होत नाही. राजभर समाजातील लोक मुलांचे पालन पोषण ताडी पाजूनच करतात असंही बसपा प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांनी सांगितलं. यावेळी राजभर यांनी माजी कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, काही लोक समाजातील लोकांची दिशाभूल करून स्वत:चं हित साधत आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. समाजातील लोकांना बसपा सन्मान देते.
बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून आम्हाला मत देण्याचा अधिकार दिला आहे. यामुळे आम्ही आपली ओळख बनवी शकलो आहे. मायावतींनी आपल्या समाजाला सर्वाधिक सन्मान दिला. सुखदेव राजभर यांना विधानसभेत सर्वोच्च पदावर बसवलं. तुम्ही पुन्हा मायावतींना मुख्यमंत्री बनवा असं आवाहनही भीम राजभर यांनी केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.