Haryana DSP Death News Haryana DSP Death News
देश

अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या डीएसपीला डंपरने चिरडले; जागीच मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

हरयाणा : मेवातमध्ये डीएसपीला डंपरने चिरडल्याची घटना समोर आली आहे. डीएसपी सुरेंद्र सिंह हे अवैध उत्खनन रोखण्यासाठी (Illegal Mining) पोहोचले होते. परंतु, माफियाच्या लोकांनी त्यांच्यावर डंपर चढवला. यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू (Death) झाला. सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना अवैध उत्खननाची माहिती मिळाली होती. ते तपासासाठी घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी अवैध उत्खननात गुंतलेला डंपर त्यांच्यावर चढवण्यात आला. आरोपींचा शोध सुरू आहे, असे नूह पोलिसांनी सांगितले.

डीएसपी सुरेंद्र सिंह हे लवकरच निवृत्त होणार होते. सध्या मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. या घटनेत आणखी एका ट्रकचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात चालकाचा शोध सुरू आहे.

घटनास्थळी अवैध उत्खनन (Illegal Mining) केले जात होते. डीएसपींनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक त्याच्यावर ढकलला. मारेकरी लवकरच पकडले जातील आणि कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन हरयाणा पोलिसांनी ट्विटमध्ये दिले आहे. तवडू उपविभागातील अरवली भागातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात खाण माफिया अवैध उत्खनन करीत आहे.

खाण (Mining) माफियांनी डीएसपीवर डंपर टाकला. या अपघातात डीएसपीचा जागीच मृत्यू (Death) झाला. अपघातानंतर खाण माफिया घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच एसपी नूह आणि एसडीएम आणि तहसीलदार तावडू यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून गाव आणि अरवली डोंगर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, असे डीएसपी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT