Ravi Uppal Arrested 
देश

Ravi Uppal Arrested : महादेव बेटिंग अ‍ॅपच्या को-फाउंडरला युएईमध्ये अटक; लवकरच भारतात होऊ शकते प्रत्यार्पण

उप्पल भारतात वॉन्टेड असून त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

रोहित कणसे

महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपचा सहसंस्थापक रवी उप्पल याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) अटक करण्यात आली आहे. तो भारतात वॉन्टेड असून त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. रवी महादेव हा अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरव चंद्राकरचा साथीदार आहे. दरम्यान भारतीय यंत्रणा युएई पोलिसांच्या संपर्कात असून उप्पलचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होऊ शकते.

महादेव बुक अ‍ॅप सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असे. भारतात यावर बंदी घालण्यात आली आहे. पण इतर देशांमध्ये हे अ‍ॅप सुरू आहे. मूळचा छत्तीसगडचा असलेला चंद्राकर आणि त्याचा साथीदार रवी उप्पल दुबई येथे हा व्यवसाय चालवत. दोघांविरोधात लुकआऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते.

सौरव चंद्राकर यापूर्वी रायपूरमध्ये ज्यूस सेंटर चालवत होता. त्यानंतर तो सट्टेबाजीत करू ळागला. सौरव आणि रवी यांच्याकडे 6000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा संशय आहे. हवालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोकड दुबईला पाठवण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम टोळीने दुबईतून एवढ्या मोठ्या प्रमाणात महादेव बुक अ‍ॅप ऑपरेट करण्यात मदत केल्याचा संशय यंत्रणांना आहे. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर देखील या प्रकरणात आरोप आहेत.

महादेव ऑनलाइन बुक पोकर, कार्ड गेम, चान्स गेम, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल इत्यादी सारख्या लाइव्ह गेम्समध्ये सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म पुरवत असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. या अ‍ॅपमुळे तीन पत्ती, पोकर असे अनेक कार्ड गेम्स खेळता येतात. ड्रॅगन टायगर, पत्ते इत्यादींचा वापर करून व्हर्च्युअल क्रिकेट गेम्स तसेच भारतात होणाऱ्या विविध निवडणुकांवर देखील सट्टा लावला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT