Guahati Airport 
देश

Video: आसाममध्ये तुफान पाऊस; एअरपोर्टचं छत कोसळलं, विमानांचे मार्ग वळवले

आसाममध्ये सध्या तुफान पाऊस सुरु असून या पावसाचा फटका इथल्या विमानतळाला बसला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

आसाममध्ये सध्या तुफान पाऊस सुरु असून या पावसाचा फटका इथल्या विमानतळाला बसला आहे. लोकप्रिय गोपिनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताचा काही भाग अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळं रविवारी कोसळला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पण यामुळं सहा विमानांचे मार्ग बदलण्यात आले. या विमानतळच्या देखभालीची जबाबदारी अदानी ग्रुपकडे आहे. (Due to heavy rain guwahati airport portion of ceiling collapses flights diverted)

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यात छताचा एक भाग अचानक कोसळताना दिसत आहे. अचानक घडलेल्या या घटनामुळं प्रवासी आणि विमानतळ कर्मचारी बचावासाठी धावताना दिसत आहेत. तर इतर काही व्हिडिओंमध्ये विमानतळ कर्मचारी आवारातील अतिरिक्त पाणी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

विमानतळ कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, "विमानतळाच्या छताचा जो भाग कोसळला तो खूप जुना झाला होता आणि त्यामुळं तुफान पाऊस आणि हवा तो सहन करू शकला नाही. त्यामुळं तो भाग कोसळला आणि त्यामुळं टर्मिनलमध्ये पाणी वाहू लागलं. मात्र, यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही आणि सर्व काही नियंत्रणात आहे," (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची उड्डाणं आगरतळा आणि कोलकाता इथं वळवण्यात आली आहेत. पण नंतर दृश्यमानता सुधारल्यानं विमानाची उड्डाणं पुन्हा सुरू करण्यात आली आणि गुवाहाटी विमानतळावर विमानं उतरण्यास सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT