दुर्गा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडलीय.
जलपायगुडी : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) दुर्गा विसर्जनादरम्यान (Durga Visarjan) मोठी दुर्घटना घडलीय. जलपायगुडीतील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळं 8 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
याशिवाय, अनेक जण अजूनही नदीत अडकले आहेत. एनडीआरएफची टीम रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. 30-40 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं समजतं. दुर्गा विसर्जनाच्यावेळी माल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळं जोरदार प्रवाहात अनेक लोक वाहून गेले.
या घटनेची माहिती मिळताच एकच घबराट झाली. पाण्यात वाहून गेलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरु केला. अपघातानंतर लगेचच जिल्हा प्रशासनानं विसर्जनाचा कार्यक्रम थांबवला. त्यानंतर लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. या अपघातात 8 जणांचे मृतदेह सापडले असून 10 जखमींना वाचवण्यात यश आलं आहे. अजूनही बचाव कार्य सुरुच आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.