Narendra Modi and Dr. Manmohan Singh sakal
देश

Dr. Manmohan Singh : मोदीकाळात देशात आर्थिक गोंधळ; डॉ. मनमोहन सिंग यांची केंद्र सरकारवर टीका

डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या मतदारांना आवाहन करणारे एक पत्र प्रसिद्धीला दिले असून याद्वारे त्यांनी मागील दहा वर्षांत झालेल्या आर्थिक व्यवस्थेच्या स्थितीवर टीका केली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळातील मागील दहा वर्षे देशाची अर्थव्यवस्था अकल्पनीय गोंधळाची साक्षीदार ठरली आहे,’ अशा शब्दांत माजी पंतप्रधान व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात, म्हणजे एक जूनला पंजाबमध्ये मतदान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर डॉ. सिंग यांनी पंजाबच्या मतदारांना आवाहन करणारे एक पत्र प्रसिद्धीला दिले असून याद्वारे त्यांनी मागील दहा वर्षांत झालेल्या आर्थिक व्यवस्थेच्या स्थितीवर टीका केली आहे. ‘नोटबंदीचा निर्णय, अनेक उणिवा असलेला जीएसटी कायदा, कोरोना काळात नियोजनातील विस्कळितपणा यामुळे ही स्थिती अधिक दुःखदायक झाली.

त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) घट झाली. मोदीकाळात देशाचा सरासरी जीडीपी सहा टक्क्यांच्या खाली आला आहे. ‘यूपीए’च्या काळात जीडीपी आठ टक्के होता,’ असे डॉ. सिंग यांनी म्हटले आहे. ‘काँग्रेसपुढे अनेक संकटे असतानाही ‘यूपीए’च्या काळात देशातील जनतेच्या क्रयशक्तीमध्ये वाढ झाली होती.

मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे देशांतर्गत गुंतवणुकीतही घट झाली आहे. ही घट ४७ वर्षांतील नीचांकी आहे. या काळात युवावर्गाकडे सर्वाधिक दुर्लक्ष झाले आहे. जवळपास ३० लाख पदे रिक्त आहेत,’ असेही डॉ. सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.

‘काँग्रेस हाच आशेचा किरण’

आपल्याला देशाची लोकशाही वाचविण्याची ही संधी असल्याचे आवाहन डॉ. मनमोहन सिंग यांनी केले आहे. ‘देशाला हुकूमशाहीच्या वरवंट्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकरी आंदोलनात पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्यांना दिलेले कोणतेही आश्‍वासन पंतप्रधान मोदी पूर्ण करू शकलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दिलेले पाच न्यायांचे आश्वासन हा आशेचा नवा किरण आहे,’ असे डॉ. सिंग यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT