केंद्रीय अन्वेषण यंत्रणेनं 17 ऑगस्ट रोजी हा गुन्हा दाखल केला होता.
नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या (Delhi Government) उत्पादन शुल्क विभागाशी (Excise Department) संबंधित प्रकरण ताब्यात घेतल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयानं (ED) आज (मंगळवार) सकाळी मोठी कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्ली व्यतिरिक्त, हरियाणातील गुरुग्राम, फरीदाबाद, महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai), पंजाब (Punjab), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) यासह इतर अनेक राज्यांमध्ये 30 हून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आलीय.
केंद्रीय अन्वेषण यंत्रणेनं (CBI) 17 ऑगस्ट रोजी हा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सीबीआयनं या प्रकरणी 30 हून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. सीबीआयनं नोंदवलेल्या एफआयआरनुसार, उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya, Deputy CM, Delhi) यांना पहिला आणि मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं. या प्रकरणात अनेक अज्ञात आरोपी, कंपन्यांसह एकूण 16 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. सीबीआयनं नोंदवलेल्या याच प्रकरणाचा ताबा घेत ईडी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत त्याची चौकशी करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.