Hemant Soren esakal
देश

Hemant Soren: ईडीला सापडली कार, पत्नी होणार मुख्यमंत्री? हेमंत सोरेन गायब झाल्यापासून ४० तासात काय घडलं?

जमीन घोटाळ्यात ईडीकडून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली: जमीन घोटाळ्यात ईडीनं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची अनेकदा चौकशी केली आहे. आता पुन्हा ईडीनं चौकशीसाठी त्यांच्याघरी पोहोचले आहेत. पण सोरेनं नॉटरिचेबल झाले आहेत. वॉरंटसह आलेल्या ईडीनं १५ तासांच्या चौकशीनंतर त्यांनी सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत.

तर दुसरीकडं सोरेन हे आपल्या पत्नीला मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. (ED seized Hemant Soren car his wife may take charge as chief minister what happened in the 40 hours)

गेल्या ४० तासांत नेमकं काय घडलंय?

हेमंत सोरेन हे शनिवारी, २७ जानेवारीला रात्री उशीरा अचानक रांचीहून दिल्लीकडे रवाना झाले होते. एका चार्टर फ्लाईटनं ते दिल्लीला पोहोचले होते. त्यावेळी अशी चर्चा होती की ते काही राजकीय भेटीगाठींसाठी दिल्लीला गेले आहेत. या ठिकाणी ते ईडीच्या कारवायांविरोधात कायदेशीर सल्ला घेणारा आहेत. (Latest Marathi News)

कारण तत्पूर्वी ईडीनं त्यांना दहावं समन्स पाठवलं होतं. तसेच २९ जानेवारीपासून ३१ जनेवारीदरम्यान ईडीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. जर ते ईडीसमोर आले नाहीत तर एजन्सीजना त्यांच्या घरी जाऊन चौकशी करावी लागेल. त्यानंतर सोरेन यांचा संपर्क होत नसल्यानं ईडी पहिल्यांदा सोमवारी त्यांच्या घरी पोहोचली. याठिकाणी तब्बल १५ तास चौकशी केल्यानंतर त्यांनी सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार आणि काही कागदपत्रे जप्त केली होती.

दरम्यान, यापूर्वी २० जानेवारीला ईडीनं जमीन घोटाळ्यात झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या रांची इथल्य घरी पोहोचली. कारण याच महिन्याच्या सुरुवातील सोरेन त्यांनी थेट केंद्रीय एजन्सीला पत्र लिहून म्हटलं की, जमीन घोटाळ्यात त्यांचा जबाब त्यांच्या अधिकृत घऱी नोंदवला जाईल. त्यानतर २० जानेवारीला ईडीनं सोरेनं १३ जानेवारीला आठवं समन्स जाहीर करत १६ ते २० जानेवारीपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले होते. (Latest Marathi News)

निशिकांत दुबेंचा ट्विटमधून खळबळजनक दावा

निशिकांत दुबे यांनी ट्विट करुन सोरेन यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, "आपले मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी गायब होऊन आज झारखंडच्या लोकांचा मानसन्मान मातीत मिसळला आहे. त्यांनी आपल्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस तसेच सहकारी आमदारांना रांचीमध्ये सर्व बॅगा भरुन बोलावलं आहे.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन हे आपली पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत. मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीच्या चौकशीच्या भीतीनं रस्ते मार्गानं रांची इथं पोहोचून आपणं समोर येऊ असही त्यांनं म्हटलं आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT