देश

Edible Oil :महागाईने त्रस्त असणाऱ्या सामान्यांना मिळणार दिलासा; खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता

दिवाळी सणाच्या तोंडांवर सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी सणाच्या तोंडांवर सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. देशात खाद्यतेलाच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे. देशात ऑगस्ट महिन्यात पामतेलाच्या आयातीमध्ये 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर सप्टेंबर महिन्यात 10 लाख टन तेल आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या महिन्यात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

भारताने ऑगस्ट महिन्यामध्ये विक्रमी तेलाची आयात केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात देशात 87 टक्के जास्त तेल आयात करण्यात आलं आहे. गेल्या 11 महिन्यातील ही सर्वाधिक आयात आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किंमती 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत. पामतेलाची किंमत 1800-1900 डॉलर मेट्रिक टनावरून घसरून 1000-1100 डॉलर मेट्रिक टन वर घसरली आहे.

इतर खाद्यतेलापेक्षा स्वस्त असलेले पामतेल अधिक प्रमाणात आयात केलं आहे. त्याचबरोबर देशात सणासुदीचा काळ आहे. काही दिवसांवर दसरा, दिवाळी आहे. त्यातच दिवाळीनंतर लग्नसराईचाही हंगाम येत आहे. या परिस्थितीत पामतेलाची मागणी आणखी वाढू शकते. त्यामुळे पामतेलाची आयात वाढली असून आगामी काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. तर केंद्र सरकारने पामतेलाच्या आयातीवर 5.5 टक्के कर लावला आहे. त्याचबरोबर सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात चालू आणि पुढील वर्षासाठी शुल्कमुक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT