Byjus Job Cut Down:भारतातील सर्वात मोठी एडटेक कंपनी 'बायजू' पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याची योजना आखत आहे. कंपनीने पुनर्रचना करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. बायजू्'ज यावेळी ४ हजार ते ५ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी करत आहे. यावर कंपनीच्या सीईओंचं विधान देखील समोर आलं आहे.
नवीन सीईओने कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्याची कसरत सुरू केली आहे.या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांचे म्हणणे आहे की अर्जुन मोहन, एडटेक फर्म Byju's चे नवे भारताचे CEO, यांनी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, ज्यामुळे 4,000-5,000 नोकऱ्या कमी होऊ शकतात.
कंपनीकडून काय सांगण्यात आलं?
मोठ्या प्रमाणात कंपनीतून कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या धोरणाबाबत कंपनीकडून सांगण्यात आलं की ऑपरेशनल स्ट्रक्चर सोप बनवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आम्ही कर्मचारी कमी करण्याची तयारी करत आहोत.
चांगल्या 'कॅश फ्लो मॅनेजमेंटसाठी' व्यवसायाची पुनर्रचना केली जात आहे आणि आता तो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बायजूचे नवे इंडिया सीईओ अर्जुन मोहन पुढील काही आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण करतील आणि नियमित कामकाजासाठी नवीन धोरणं लागू करतील.(Latest Marathi News)
कंपनीच्या नव्या CEO कडून पुनर्रचनेला मोठ्या प्रमाणात सुरुवात
एडटेक कंपनी बायजूचे भारताचे नवे सीईओ अर्जुन मोहन यांनी मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्यासाठी तयारी सुरु केली आहे, ज्यामुळे ४ ते ५ हजार लोकांना आपला जॉब गमवावा लागू शकतो, असं मत जानकारांनी व्यक्त केलं आहे.
या नोकऱ्या कपातीमुळे Byju च्या ऑपरेटिंग युनिट Think and Learn Private Limited च्या भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही परिणाम होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय आकाश कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग असेल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.