narendra modi narendra modi
देश

नाकातून देण्यात येणाऱ्या लसीवरही संशोधन सुरु - पंतप्रधान

Amit Ujagare (अमित उजागरे)

देशात नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीवरही संशोधन सुरु आहे, यावर आपल्याला यश मिळालं तर त्यामुळे भारताच्या लशीकरण मोहिमेला आणखी वेग येईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सरकारच्या लशीकरण कार्यक्रमाची माहिती दिली. (Efforts underway for nasal vaccination PM Modi)

मोदी म्हणाले, "गेल्या मोठ्या काळापासून देश सातत्यानं लशीकरणासाठी प्रयत्न करत आहे. त्यातून येणाऱ्या काळात लशीचा पुरवठा अजून वाढणार आहे. आज देशात सात कंपन्या विवध प्रकारच्या लशींचं उत्पादन करत आहेत. तीन आणखी लशींची उत्पादन प्रक्रिया सुरु आहे. लशींचा पुरवठा वाढवण्यासाठी परदेशातील दुसऱ्या कंपन्यांसोबतही लस खरेदी प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे."

लशीकरण मोहिमेला आणखी वेग येईल

"देशात सध्या काही तज्ज्ञांद्वारे आपल्या मुलांबाबत देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता या दिशेने देखील दोन लशींचं ट्रायल वेगानं सुरु आहे. याशिवाय सध्या देशात नेझल व्हॅक्सिनवरही संशोधन सुरु आहे. नोझल व्हॅक्सीन अर्थात नाकाद्वारे देण्यात येणारी लस ही सिरिंजद्वारे दंडावर न टोचता ती नाकात स्प्रेद्वारे देण्यात येणार आहे. देशाला जर भविष्यात या लसीवर यश मिळालं तर यामुळे भारताच्या लशीकरण मोहिमेत आणखी वेग येईल" असंही मोदी यावेळी म्हणाले.

WHO च्या गाईडलान्सप्रमाणं आपण काम केलं

इतक्या कमी वेळेत लस बनवणं हे संपूर्ण मानवतेसाठी आपल्यातच एक मोठी उपलब्धी आहे. मात्र, या कामाच्या स्वतःच्या मर्यादा देखील आहेत. लस तयार झाल्यानंतरही देशातील खूपच कमी देशात लशीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. जास्तकरुन समृद्ध देशांमध्येच लशीकरण सुरु झालं. WHOनं लशीकरणाबाबत गाईडलाईन्स दिल्या. या गाईडलान्स तंतोतंत पाळत आपण देशांतर्गत लसीकरण सुरु केलं, असंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT