Mumbai News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कलंकीत नेता असं संबोधल्यानं उद्धव ठाकरेंविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. त्यांच्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांवर कलंकाचा आरोप करण्याचा अधिकार ठाकरेंना नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे. (Eknath Shinde attack on Uddhav Thackeray on accusation on Devendra Fadnavis)
शिंदे म्हणाले, "सगळ्या मर्यादा तोडून राज्यात आरोप-प्रत्यारापोचं राजकारण सुरु झालं आहे. आम्ही विकासाचं राजकारण करतो आहोत. दुर्देवानं यांच्याबद्दल जे शब्द वापरण्यात आले ते अतिशय दुर्देवी आहेत, याची निंदा करावी तेवढं थोडं आहे. (Latest Marathi News)
"२०१९ला बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली गेली तसेच त्यांच्या नावाला ज्यांनी कलंक लावला त्या कलंकीत लोकांनी देवेंद्रसारख्या नेत्यावर कंलकाचा आरोप लावायचा हे हास्यास्पद आहे. यावरुन राजकारणाची पातळी किती घसरली आहे हे दिसून येतं" (Marathi Tajya Batmya)
आमच्या विकासाच्या राजकारणामुळं यांना पोटदुखी होत आहे, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरे अनेक अडचणींत असताना फडणवीसांनी त्यांना अनेकदा मदत केली, न्याय दिला, कामं केली, याची जाणीव तरी ठेवली पाहिजे. हा तुमचा कृतघ्नपणा आहे. फडणवीसांनी त्यांना जी मदत केली हे जगाला माहिती आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार तुम्हाला पहायला मिळेल, असंही मुख्यमंत्री सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.