देश

वृद्धाने १० महिन्यांत ११ वेळा घेतली कोरोनाची लस; आजारातून आराम

ब्रह्मदेव मंडल यांनी ग्रामीण डॉक्टर म्हणून दीर्घकाळ काम केले आहे

सकाळ डिजिटल टीम

बिहार : केंद्र असो किंवा राज्य सरकार कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. शंभर टक्के लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे दंड आकारण्याची, प्रवेश नाकारण्याची भाषाही वापरली जाते. असे असताना कोरोना लसीकरणाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे पुढे आले आहे. बिहारमधील एका वृद्धाने एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस (corona vaccination) घेतली. ब्रह्मदेव मंडल (वय ८४, रा. पुरैनी ब्लॉक, औरई, मधेपुरा) असे त्या वृद्धाचे नाव आहे. (elderly are vaccinated coronavirus 11 times in 10 months)

ब्रह्मदेव मंडल यांनी १० महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतली (corona vaccination) आहे. असा दावा खुद्द त्यांनीच केला आहे. १२ व्यांदा लस घेण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यांना यश मिळू शकले नाही. कोरोनाची लस घेतल्यानंतर गुडघेदुखी (Relief from knee pain) कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. गुडघेदुखीतून कायमची सुटका मिळावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून लसी घेतल्या.

ग्रामीण डॉक्टर म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. लस घेतल्याच्या तारखाही त्यांनी कागदावर नोंदवल्या आहेत. लसीचा १२ वा डोस घेण्याचा प्रयत्न केला असता तो फसला. त्यांनी या लसी एकच आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकावरून घेतल्या. सरकारचे लक्ष नसल्याचे यावरून दिसून येते, असे त्यांनी म्हटले.

माझ्या फायद्यासाठी इतक्या लसी घेतल्या. मला आणखी लसीकरण करायचे आहे, असे ब्रह्मदेव मंडल यांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सीएस अमरेंद्र प्रताप शाही यांनी अहवाल मागवला आहे. हे खरे असेल तर दोषींवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

या दिवशी घेतल्या लसी

  • पहिली लस - १३ फेब्रुवारी रोजी जुन्या पीएचसीमध्ये

  • दुसरी लस - १३ मार्च रोजी जुन्या पीएचसीमध्ये

  • तिसरी लस - १९ मे रोजी औरई उपआरोग्य केंद्र

  • चौथी लस - १६ जून रोजी कोटा येथील भूपेंद्र भगत यांच्या कॅम्पमध्ये

  • पाचवी लस - २४ जुलै रोजी जुनी बडी हाट शाळेतील शिबिर

  • सहावी लस - ३१ ऑगस्ट रोजी नाथबाबा स्थान शिबिर

  • सातवी लस - ११ सप्टेंबर रोजी बडी हाट शाळेत

  • आठवी लस - २२ सप्टेंबर रोजी बडी हाट शाळेत

  • नववी लस - २४ सप्टेंबर रोजी उपकेंद्र कलासन

  • दहावी लस - खगरिया जिल्ह्यातील परबट्टा

  • अकरावी लस - भागलपूरमधील कहलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT