Election Commission to start myth vs reality section to Counter fake news in Lok Sabha Elections 2024 Marathi news  
देश

Lok Sabha Election 2024 : 'मिथ वर्सेस रिअ‍ॅलिटी'....निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच होणार 'फेक न्यूज'चा भांडाफोड

Lok Sabha Election 2024 Schedule : अखेर आज (१६ मार्च) रोजी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

रोहित कणसे

Lok Sabha Election 2024 Latest News : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची मागील बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती. अखेर आज (१६ मार्च) रोजी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशात १९ एप्रिल पासून सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुकांची धुमाळी पाहायला मिळणार आहे. रम्यान या लोकसभा निवडणुकीत चुकीची माहिती पसरु नये यासाठी निवडणुक आयोगाकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यामातून मतदारांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी फायदा होतो. तसेच लोकांकडे याच्या माध्यमातून टीका करण्याचा अधिकार देखील आहे. मात्र तुम्ही खोट्या बातम्या पसरवणे योग्य नाही. अफावा पसरवण्याबद्दल सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य निवडणुक आयुक्त म्हणाले. तसेच या आगामी निवडणुकीत काही नवीन गोष्टी देखील पाहायला मिळतील मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, आयटी कायद्याच्या कलम ६९ आणि ७९ (३) अंतर्गत प्रत्येक राज्यातील प्रशासनाला सोशल मीडिया पोस्ट हटवण्यास सांगण्याचे अधिकार आहेत. यासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले काही ठिकाणी केले जात आहेत.

सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांना योग्य माहितीच्या आधारे उत्तर दिलं जाणार आहे. कोणी खोटी माहिती पसरवत असेल आणि त्याच्या माध्यमातून वातावरण दुषित करत असेल तर आम्ही देखील त्याविरोधात मैदानात उतरू असेही मुख्य निवडणुक आयुक्त म्हणाले.

आम्ही लवकर आमच्या वेबसाईटवर 'मिथ वर्सेस रिअ‍ॅलिटी' ही मोहीम लाँच करणार आहोत. ही खोटी माहिती पसवली जात आहे आणि हे सत्य आहे अशा स्वरूपात यामधून माहिती दिली जाईल. खोटी माहिती पसरवली जात असेल तर त्याबद्दलचं सत्य समोर आणलं जाईल. आम्ही लोकांना फेक न्यूज बद्दल शिक्षीत करू असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी खोटी माहिती पुढे फॉरवर्ड करण्यापूर्वी ती एकदा तपासून पाहिली पाहण्याचा सल्ला देखील मुख्य निवडणूक आयुक्तांनी नागरिकांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT