देश

Gujarat Election : निवडणूक गुजरातमध्ये अन् राहुल गांधी...; हार्दिक पटेलांची टीका

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सर्वच पक्ष आणि उमेदवार आपापल्या मतदारसंघात रात्रंदिवस प्रचारात व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले हार्दिक पटेल आता भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विरमगाम विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर हार्दिक म्हणाले की, जनसेवा, लोकसेवा आणि राष्ट्रसेवा हीच आपली विचारधारा आहे. पण काँग्रेसला हे करायचे नाही. मी माझी विचारधारा बदललेली नाही, तर निर्णय घेतला आहे. 'काँग्रेस सातत्याने गुजरातच्या विरोधात आहे. मला राम मंदिरासाठी दान करण्यापासून रोखण्यात आले होते. काँग्रेसला स्थानिक प्रश्नांचं काही घेणंदेणं नाही, असंही हार्दिक यांनी म्हटलं.

राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'वर हार्दिक पटेल म्हणाले की, गुजरातमध्ये निवडणूक आहे आणि ते दक्षिणेत फिरत आहे. गुजरातसाठी दूरदृष्टी नाही, योजना नाही. अशा परिस्थितीत लोकांना काँग्रेस कशी आवडेल? 'काँग्रेसला कणखर लोकांची गरज नाही, त्यांना फक्त पुढेपुढे करणाऱ्यांची गरज आहे. मी तेव्हा स्पष्ट बोललो की, तुम्हाला असंच करायचं असेल तर मी इथं थांबू शकत नाही, असंही हार्दिक यांनी सांगितलं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

'काँग्रेस पक्ष सोडणारा मी एकटाच नाही. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, ज्योतिरादित्य सिंधिया, आरपीएन सिंह अशा अनेकांनी बराच काळ राहून पक्ष सोडला. मला दोन वर्षांत समजलं ते चांगलंच झालं. मी केसच्या भीतीने भाजपमध्ये आलो नाही, माझ्यावर अजूनही 32 खटले आहेत, सर्वोच्च न्यायालयाने माझ्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, असं हार्दिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT