Electoral Bond: निवडणूक आयोगाने वेबसाईटवर इलेक्टोरल बाँडस् प्रकरणी डेटा जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कोणी किती बाँड खरेदी केले हे स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे या यादीतील बाँडचे सर्वात मोठे खरेदीदार देशातील प्रसिद्ध कंपन्या किंवा उद्योगपती नाहीत. वैयक्तिक पातळीवरही अनेक बाँड खरेदी करण्यात आले आहेत. यातून देणग्या मिळवणाऱ्या पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अनेक पक्ष आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीत पूर्वी मार्टिन लॉटरी एजन्सीज लिमिटेड म्हणून ओळखल्या जाणारी फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस अग्रस्थानी आहे. या कंपनीवर 2022 मध्ये ईडीने देखील कारवाई केली होती. त्यांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत 1350 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले होते.
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण 966 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आहेत. तिसऱ्या स्थानावर क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्यांनी 410 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. तर 400 कोटी रुपयांचे रोखे विकत घेणारी वेदांत लिमिटेड चौथ्या स्थानावर आणि हल्दिया एनर्जी लिमिटेड पाचव्या स्थानावर आहे. या कंपनीने 377 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले होते.
फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सेवा- 1350 कोटी
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड -966 कोटी
क्विक सप्लाय चेन- 410 कोटी
वेदांत लिमिटेड- 400 कोटी
हल्दिया एनर्जी लिमिटेड - 377 कोटी
भारतीय ग्रुप- 247 कोटी
एस्सेल मायनिंग अँड इंडस्ट्रीज-224 कोटी
वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड -220 कोटी
केव्हेंटर फूडपार्क इन्फ्रा लिमिटेड – 195 कोटी
मदनलाल लिमिटेड-185 कोटी
देणगी मिळालेल्या पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस, एआयएडीएमके, बीआरएस, शिवसेना, टीडीपी, वाईएसआर काँग्रेस, डीएमके, जेडी-एस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जेडीयू, आप, राजद, समाजवादी पार्टी, जम्मू काश्मीर, नॅशनल कॉन्फ्रेंस, बीजेडी, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा, जेएमएम, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट आणि इतर पक्षांचा समावेश आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.