elon musks tesla in india government rejects tesla tax breaks demand  
देश

टेस्लाच्या भारतात एंट्रीला झटका; सरकारचा करात सूट देण्यास नकार

सकाळ डिजिटल टीम

टेस्ला (Tesla) च्या भारतात प्रवेश करण्याच्या योजनेला मोठा धक्का बसला आहे. भारतात यासाठी आधीपासूनच धोरण असल्याचे सांगत आयातीवर आयात शुल्कात (Import Duty) सूट देण्याची टेस्लाची मागणी सरकारने फेटाळून लावली आहे. या धोरणांतर्गत ऑटो कंपन्यांना भारतात अर्धवट बनवलेली वाहने आयात करण्याची आणि कमी आयात शुल्कावर येथे असेंबल करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष विवेक जोहरी म्हणाले, 'आम्ही शुल्कात काही बदल करण्याची गरज आहे का याचा विचार केला आहे. आम्हाला आढळले की, काही देशांतर्गत उत्पादन केले जात आहे आणि या सध्याच्या टॅरिफ स्ट्रक्चरवर देखील गुंतवणूक होत आहे. त्यामुळे ड्यूटी यामध्ये अडथळा ठरत नाही हे स्पष्ट आहे' इंग्रजी बिझनेस न्यूज वेबसाइट इकॉनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये, टेस्लाने पंतप्रधान कार्यालयाला इलेक्ट्रिक वाहनांवर (EV) आयात कर कमी करण्यास सांगितले होते. टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कार बाहेरून आयात करून भारतात विकू इच्छित आहे. टेस्लाने भारतात आयात कर जास्त असल्याचे सांगत ते कमी करण्याची मागणी करत आहे.

सरकारने इलॉन मस्क (Elon Musk) यांना भारतात उत्पादन सुरू करण्याचे आमंत्रित दिले आहे. पण मस्कला सुरुवातीला आयात केलेल्या गाड्या भारतात विकायच्या आहेत. सरकारने वाहन आयातीवरील शुल्क कमी करावे, अशी त्यांची इच्छा आहे. आयात केलेल्या वाहनांवर भारतात 100 टक्के शुल्क आकारले जाते. तर भारतात असेंबलिंगसाठी पार्ट आयात केल्यास 15-30 टक्के शुल्क आकारले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Live Updates : तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा एफआयआर नोंदवला

SCROLL FOR NEXT