Employee send message to boss
नवी दिल्ली- आपल्या बॉससंबंधी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात. काही कर्मचारी आपल्या बॉसला खूप मानतात. त्याच्या बद्दल चांगलं बोलतात, तर काही कर्मचारी आपल्या बॉसबद्दल वाईट बोलत असतात. बॉसबद्दलच्या भावना कर्मचारी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका कर्मचाऱ्याने मद्य पेऊन रात्री उशिरा आपल्या बॉसला मेसेज केला. त्याने आपल्या बॉसबद्दल त्याला काय वाटतं हे मनमोकळेपणाने सांगून टाकलं. त्यात त्याने बॉसबद्दल कौतुकच केलं आहे. कर्मचाऱ्याने बॉसला मेसेज करुन त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी आभार मानले. तसेच इतका चांगला मॅनेजर मिळाला यासाठी स्वत:ला नशिबवान म्हटलं.
मेसेजमध्ये काय लिहिलंय?
कर्मचाऱ्याने मेसेजमध्ये लिहिलंय की,' मी आज दारु प्यायलो आहे, पण मला तुम्हाला काही सांगायचं आहे. माझ्यावर जो तुम्ही विश्वास दाखवलाय त्यासाठी धन्यवाद. मला तुम्ही नेहमी चांगलं करण्यासाठी प्रोत्साहित करता त्यासाठी धन्यवाद. एका चांगल्या कंपनीपेक्षा एक चांगला मॅनेजर मिळणे जास्त अवघड असते. यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.' त्यानंतर कर्मचाऱ्याने एक स्मायली पाठवली आहे.
कर्मचाऱ्याने रात्री उशिरा दारुच्या नशेत हा मेसेज पाठवला. त्यात त्याने आपल्या बॉसबद्दलच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्यात. यानंतर कर्मचाऱ्याच्या बॉसने हा मेसेज ट्विटरवर शेअर केला. ट्विटरवर शेअर करताच अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली.
लोक काय म्हणाले?
अनेकांनी ट्विटवर प्रतिक्रिया देताना आम्हालाही असा बॉस मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. एका युझरने म्हटलंय की, तुम्ही माझे बॉस असता तर खूप चांगलं झालं असतं. ज्यांना तुमच्यासारखा बॉस मिळालाय ते नशिबवान आहेत. तुम्ही खरंच खूप चांगलं काम करत आहात. दुसऱ्या एका युझरने म्हटलं की, सामान्यपणे लोकांच्या मनात बॉसविषयी कटुता असते. पण, तुम्ही एक चांगले व्यक्ती दिसता. आणखी एक युझर म्हणतो की, दारु प्यायल्यानंतर लोक खरं बोलतात. त्यामुळे खरंच तुम्ही चांगले बॉस असाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.