कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षात लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागले. यातील एक म्हणजे नोकरीतील अनिश्चितता. मात्र आता कर्मचाऱ्यांसाठी (Employee) खूशखबर आहे. कारण भारतातील पगारवाढ (Increase in Salary) 2022 मध्ये पाच वर्षांच्या उच्चांकावर जाईल, असं एका सर्व्हेमध्ये समोर आलंय. ही पगारवाढ तब्बल 9.9 टक्क्यांच्या पाच असू शकते, असंही सर्वेक्षणात दिसून आले आहे.
जगातील नामांकित Aon संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशातील उद्योगांमधील विविध संघटनांनी 2022 मध्ये 9.9 टक्के पगारवाढीचा अंदाज वर्तवला आहे. गतवर्षी ही पगारवाढ 9.3 टक्के होती. (Employees in India may get highest salary hike in 5 years)
चीन, रशिया पेक्षा चांगली पगारवाढ -
भारतामध्ये 2022 मध्ये BRIC (ब्राझील, रशिया, भारत आणि चीन) राष्ट्रांमध्ये सर्वाधिक पगार वाढवण्याचा अंदाज आहे. चीनमध्ये पगारवाढ ६ टक्के असेल तर रशियामध्ये पगारवाढ ६.१ टक्के आणि ब्राझीलमध्ये ५ टक्के असेल, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. 40 हून अधिक उद्योगांमधील 1,500 कंपन्यांच्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर असे नमूद करण्यात आले आहे की, ई-कॉमर्स आणि व्हेंचर कॅपिटल, हायटेक/आयटी आणि आयटी सक्षम सेवा (ITeS) आणि जीवन विज्ञान हे सर्वाधिक अंदाजित पगारवाढ असलेले उद्योग हे असतील.
सर्वेक्षणातील सहभागी व्यक्तींनी 2021 मध्ये या दशकातील सर्वाधिक अॅट्रिशनचा आकडा नोंदवला तो 21 टक्के होता.
"अस्थिर काळातील ही वेतनवाढ कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी ठरू शकते. जेव्हा नियोक्ते प्रतिभेच्या वाढत्या खर्चाला विक्रमी-उच्च अट्रिशन आकड्यांसोबत जोडता तेव्हा ती दुधारी तलवार म्हणून उदयास येऊ शकते," असे Aon's Human Capital Solutions in India मधील भागीदार आणि सीईओ नितीन सेठी यांनी सांगितले.
सेठी पुढे म्हणाले की, "आर्थिक पुनर्प्राप्ती आणि लवचिक कार्यबल तयार करण्यासाठी संस्थांनी नव्या दमाच्या व्यक्तींच्या क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. "
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.