enginering e sakal
देश

Engineering: १० वर्षांत घटल्या सर्वाधिक जागा; यंदा ६३ इन्स्टिट्यूट्स बंद

विनायक होगाडे

नवी दिल्ली : इंजिनिअरिंग हा सर्वांत महत्त्वपूर्ण कोर्स मानला जातो. बहुतांश विद्यार्थी आपल्या करिअरसाठी इंजिनिअरिंग हेच क्षेत्र निवडताना दिसतात. एकतर या क्षेत्रामध्ये रोजगार मिळण्याची संधी तुलनेने जास्त आहे, शिवाय इन्स्टिट्यूट्सची उपलब्धता मोठी असल्याने या कोर्सची फी देखील बऱ्याच जणांच्या आवाक्यात असणारी असते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी हाच मार्ग निवडताना दिसतात. मात्र आता ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशन (एआयसीटीई) (All India Council for Technical Education) च्या नव्या आकडेवारीवरुन एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या आकडेवारीवरुन लक्षात येत आहे की, अंडरग्रॅज्यूएट, पोस्टग्रॅज्यूएट आणि डिप्लोमा लेव्हलवर इंजिनिअरिंगच्या जागांची संख्या कमी होऊन २३ लाख २८ हजार झाली आहे. गेल्या दहा वर्षांमधील ही सर्वांत कमी आकडेवारी असल्याचं निष्पन्न झालंय. याप्रकारची घट ही वर्ष २०१५-१६ पासूनच पहायला मिळत होती. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार, अनेक इंजिनिअरिंग संस्था बंद झाल्याकारणाने आणि ऍडमिशनची क्षमता कमी झाल्या कारणाने यावर्षी इंजिनिअरिंगमध्ये १.४६ लाख जागा कमी झाल्या आहेत.

एवढी मोठी घट झाल्यानंतरही इंजिनिअरिंग आजही देशातील टेक्निकल एज्यूकेशन क्षेत्रातील (आर्किटेक्चर, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट आणि फार्मसी) सर्वांधिक ऍडमिशन असणारा कोर्स आहे. सध्या टेक्निकल एज्यूकेशनमध्ये इंजिनिअरिंगच्या जागा जवळपास ८० टक्के असल्याचं आकडेवारी सांगते.

वर्ष २०१४-१५ साली जेंव्हा इंजिनिअरिंग हा कोर्स अत्यंत विद्यार्थीप्रिय होता, तेंव्हा सर्व एआयसीटीई-स्विकृत संस्थांमध्ये इंजिनिअरिंग शिक्षणामध्ये जवळपास ३२ लाख जागा होत्या. मात्र, या घट होण्यामागचं कारण एकीकरण असल्याचं बोललं जातंय. त्यानंतरजवळपास ४०० इंजिनिअरिंग कॉलेज बंद केले गेले. गेल्या वर्षीचा कोरोना साथीचा काळ वगळता, वर्ष २०१५-१६ पासून प्रतिवर्षी कमीतकमी ५० इंजिनिअरिंग संस्था बंद झाल्या आहेत. तसेच यावर्षी देखील ६३ कॉलेजेस बंद करण्यासाठई एआयसीटीईला मंजूरी मिळाली आहे.

नव्या इंजिनिअरिंग कॉलेजची मंजूरी-खालच्या स्तरावर

नव्या इंजिनिअरिंग संस्थांना स्थापन करण्यासाठीची मंजूरी देखील गेल्या पाच वर्षांतील सर्वांत खालच्या स्तरावर आहे. २०१९ मध्ये एआयसीटीई ने २०२०-२१ पासून सुरु होणाऱ्या नव्या संस्थांवर दोन वर्षांच्या सवलतीची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT