Manmohan Singh 
देश

Manmohan Singh retires: एक युग संपलं! 33 वर्षांनंतर डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त

Manmohan Singh retires from Rajya Sabha: भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम करणारे देशाची माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम करणारे देशाची माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. तब्बल ३३ वर्षांच्या संसदेतील कारकीर्दीनंतर ३ एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ संपला. त्यांच्यासोबत इतर ५४ खासदारांचा देखीस संसदेतील कार्यकाळ संपला आहे. ( ex prime minister and congress leader dr Manmohan Singh retires from Rajya Sabha today)

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत. यापूर्वी त्या रायबरेली या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायच्या, पण यावेळी त्यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांचा राज्यसभेतील डेब्यु होत असल्याचं म्हणता येईल.

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या अनेक खासदारांपैकी अनेकजण लोकसभेची निवडणूक लढणार आहेत, तर काहीजण पुन्हा राज्यसभेवर येतील. मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम केलंय. त्यांच्या अनेक निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे रुप बदलले. मनमोहन सिंह १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर पोहोचले होते.

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्र्याची जबाबदारी सांभाळली होती. या काळातच अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा निर्णय घेण्यात आला. अर्थव्यवस्थेला बुस्ट देण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरला. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या काळात देशाचे पंतप्रधान देखील राहिले आहेत. मनमोहन सिंग सध्या ९१ वर्षांचे आहेत.

राज्यसभेतून सध्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, राजीव चंद्रशेखर, पशुपालन आणि मत्स्य मंत्री पुरुषोत्तम रुपाला, विदेश राज्यमंत्री वी मुरलीधरण, सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, सूचना प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे मंत्री निवृत्त होतील. यामध्ये एल मुरुगन आणि अश्विनी वैष्णव सोडून सर्व मंत्री लोकसभा लढणार आहेत.

आरजेडीचे प्रकाश झा, समाजवादी पार्टीच्या जया बच्चन हे पुन्हा राज्यसभेवर जाणार आहेत. काँग्रेसने नसीर हुसैन यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले आहे. मंगळवारी राज्यसभेतील ४९ खासदार निवृत्त झालेत, तर बुधवारी पाच खासदार निवृत्त होणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT