Pratip Chaudhari 
देश

SBIचे माजी चेअरमन प्रतीप चौधरी यांना कर्ज घोटाळा प्रकरणी अटक

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) माजी चेअरमन प्रताप चौधरी यांना कर्ज घोटाळा प्रकरणी अटक झाली आहे. राजस्थानातील जैसलमेर पोलिसांनी त्यांना घरातूनच ताब्यात घेतलं. चौधरी यांनी २०० कोटी रुपयांची संपत्ती २५ कोटी रुपयांना विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गोडावन ग्रुपनं सन २००८ मध्ये हॉटेलच्या बांधकामासाठी एसबीआयकडून २४ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्याचवेळी या ग्रुपचं दुसरं एक हॉटेल सुरु होती. यानंतर काही काळानंतर गोडावन ग्रुप या कर्जाची परतफेड करु शकला नाही. त्यानंतर या हॉटेलवरील कर्ज हे एनपीए झालं. (बुडीत ठरलं) यानंतर एबीआयनं कर्जवसूलीसाठी गोडावन ग्रुपच्या या दोन्ही हॉटेल्सवर जप्तीची कारवाई केली. यावेळी चौधरी हे एसबीआयचे चेअरमन होते. यानंतर बँकेने ही दोन्ही हॉटेल्स Alchemist ARC या कंपनीला २५ कोटी रुपयांत विकली. दरम्यान, Alchemist ARC कंपनीचे संचालक अलोक धीर हे काल फरार झाले आहेत, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

Alchemist ARC कंपनीनं सन २०१६ मध्ये ही हॉटेल्स ताब्यात घेतली आणि २०१७ मध्ये याचं मुल्यांकन केलं. यावेळी या हॉटेल्सची किंमत १६० कोटी रुपये होती. सध्या याची किंमत २०० कोटी रुपये आहे. दरम्यान, एसबीआयचे २३ वे चेअरमन असलेल्या प्रतीप चौधरी यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१३ मध्ये संपला होता. पण माध्यमांतील काही वृत्तांनुसार, एसबीआयमधून निवृत्त झाल्यानंतर चौधरी Alchemist ARC या कंपनीत संचालक म्हणून रुजू झाले.

दरम्यान, जैसलमेर येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रतीप चौधरी यांच्यासह इतर सात जणांविरोधात अटक वॉरंट काढलं. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT