बंगळूर - दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांशी (BJP National Leader) चर्चा (Discussion) केल्यानंतर काही दिवसांतच मंत्रिमंडळातील (Mantrimandal) सदस्यांची निवड केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी गुरुवारी सांगितले. ते हुबळीत पत्रकारांशी बोलत होते. (Expansion Cabinet after Discussions BJP National Leaders Basavaraj Bommai)
बोम्मई म्हणाले, की दिल्लीला उद्या जाणार आहोत. त्यानंतर दोन-तीन दिवसांत श्रेष्ठींची वेळ घेऊन मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा करून मंत्रिमंडळातील सदस्यांची निवड केली जाईल. दरम्यान, मंत्रिपदाच्या इच्छुकांनी बोम्मई मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली आहे. नवीन चेहऱ्यांना प्रधान्य देण्यात येणार असल्याच्या वृत्तामुळे अनेक वरिष्ठ नेते मंत्रिपद गमवावे लागेल या भीतीने सावध झाले आहेत.
कॉंग्रेस व जेडीएसमधून पक्षांतर करून आलेले आणि मागील सरकारात मंत्रिपद मिळविलेले आमदारही डळमळीत झाले आहेत. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याच्या वक्तव्यावर उत्तर देताना बोम्मई म्हणाले, मी त्यांच्याशी यापूर्वीही बोललो आहे. आमचे परस्पर प्रेम आणि आदरयुक्त संबंध आहेत. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असतानाही सौहार्दपूर्ण संबंध ठेवले होते. त्यांच्या भावना पक्षाच्या प्रमुखांपर्यंत पोहोचवून हा गुंता सोडविण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.