facebook friend raped woman in mathura uttar pradesh 
देश

फेसबुकवरील मैत्रीणीला म्हणाला ये आत अन्...

वृत्तसंस्था

मथुरा (उत्तर प्रदेश): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसुबक दोघांची मैत्री झाली. प्रियकराने सैन्य दलात असल्याचे खोटे सांगून फोनवर बोलत राहिला. सुट्टीवर आल्याचे सांगून भेटायला बोलावले आणि खोलीत ये म्हणाला. खोलीत गेल्यानंतर औषध देऊन बलात्कार केला आणि पळ काढला. पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने मुकेश राणा नावाच्या व्यक्तीविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. बलात्कारानंतर त्याने पीडित महिलेला रेल्वे स्थानकावर सोडून त्याने पळ काढला आहे. याबाबतचा पुढील तपास करत आहोत.

कोलकता येथे राहणाऱया पीडित महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'फेसबुकवरून चार वर्षांपूर्वी मुकेश राणा नावाच्या युवकासोबत ओळख झाली होती. त्याने सैन्य दलात कार्यरत असल्याचे सांगितले. आमच्यात मैत्री झाल्यानंतर फोनवरून बोलू लागलो. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या चार वर्षांमध्ये त्याने अनेकदा शारिरीक अत्याचार केला आहे. सुट्टीवर आल्याचे सांगून त्याने भेटायला बोलावले. एका खोलीमध्ये गेल्यानंतर त्याने दरवाजा बंद करून औषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर बलात्कार केला. पुढे तीन दिवस बलात्कार करत राहिला. रेल्वे स्थानकावर नेऊन त्याने तेथून पळ काढला. बलात्कारादरम्यान त्याने आपण विवाहीत असून, सैन्य दलात नसल्याचे सांगितले. तो भरतपूरचा रहिवासी आहे, त्याने माझा मोबाईल तोडला असून, पुरावे नष्ट केले आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

'राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून गेलेल्‍या गद्दारांना पाडाच'; शरद पवारांचा अजितदादांच्या आमदारांना इशारा

Ajit Pawar: पार्थ पवार म्हणतात, भाजप-शिवसेनेसोबत गेल्याने आम्ही बदलणार नाहीत; आम्ही तर...

Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम, आता एक व्हावे लागेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT