Agra teacher Malti Verma fell victim to a fake call scam, leading to a heart attack esakal
देश

माणुसकी हरवली ! "तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये सहभागी..."; ऐकताच आईचा मृत्यू, नंतर कळलं फेक होता कॉल

Sandip Kapde

सध्याच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान जसं जीवन सोपं करत आहे, तसंच सायबर गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना आग्रामध्ये घडली आहे, जिथे एका आईला "तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे" असं सांगणारा फोन आला आणि त्याच ऐकून त्या आईने प्राण सोडले. नंतर कळलं की हा फेक कॉल होता आणि ते फसवणूक करणारे लोक होते.

फेक कॉलमुळे शिक्षिकेचा मृत्यू-

30 सप्टेंबर रोजी, आग्रामध्ये राजकीय कन्या जूनियर हायस्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या मालती वर्मा यांना व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख पोलीस म्हणून दिली आणि सांगितले की त्यांच्या मुलीला सेक्स रॅकेटमध्ये पकडले आहे. त्यांना धमकी देण्यात आली की 1 लाख रुपये दिले नाहीत, तर मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.

हे ऐकून मालती वर्मा यांच्या हृदयाची धडधड वाढली, त्यांना धक्का बसला. त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्या हार्ट अटॅकने कोसळल्या. नंतर त्यांच्या मुलाने त्याच्या बहिणीशी संपर्क साधला आणि तिला सगळं विचारलं. मुलगी कॉलेजमध्ये असल्याचे कळल्यावरही मालती वर्मा यांचा तणाव कमी झाला नाही. त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड होत गेला आणि अखेरीस त्यांचा मृत्यू झाला.

नवा फसवणुकीचा प्रकार-

ही घटनेत ‘डिजिटल अरेस्ट’ हा नवा प्रकार समोर येत आहे. या प्रकारात फसवणूक करणारे लोक, पीडितांच्या भावना वापरून त्यांना आर्थिक फसवणुकीत अडकवतात. फेक कॉल्सद्वारे लोकांना गोंधळात टाकून पैसे उकळण्याचा हा नवा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा-

आग्रा पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. मालती वर्मा यांना आलेल्या कॉल्सची तपासणी सुरू असून या घटनेमुळे अनेक लोकांना जागरूकता करण्याची गरज आहे. पोलीस अधीक्षक मयंक तिवारी यांनी म्हटलं, "डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. याविरुद्ध लढण्यासाठी जनतेने जागरूक आणि सतर्क राहणे गरजेचे आहे. डिजिटल युगात सायबर सुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मेट्रोची Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

Women's T20 World Cup: भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पहिली बॉलिंग करणार, जाणून घ्या दोन्ही टीमची 'प्लेइंग-11'

Salil Ankola Mother Found Dead : माजी क्रिकेटपटू सलिल अंकोला यांच्या आईचा खून? घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ

Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द! नेमकं कारण काय?

PAK vs SL मॅचमध्ये वाद, आधी आऊट, मग नॉट आऊट... रुमालामुळे निर्णयच बदलला! काय घडलं?

SCROLL FOR NEXT