Fake Income Tax Officer esakal
देश

Fake Income Tax Officer: परीक्षा पास झाला नाही अन् घरी सांगितलं आयकर अधिकारी झालो, गाडीवरही लावली नेमप्लेट; असं फुटलं बिंग

Fake Income Tax Officer: बनावट आयकर अधिकाऱ्याचे बिंग फुटले आहे. एसएससीची परिक्षा पास न झाल्यामुळे तो गाडीवर आयकर अधिकाऱ्यानी नेमप्लेट लावून फिरत होता.

Sandip Kapde

Fake Income Tax Officer: कानपूरमधील रितेश शर्मा एसएससीची (Staff Selection Commission) तयारी करत होता. मात्र तो पास होऊ शकला नाही. मग बनावट आयकर अधिकारी बनण्याची योजना आखली. सुमारे आठ महिने तो आपल्या कुटुंबापासून ते आजूबाजूच्या लोकांना आयकर अधिकारी असल्याचे सांगत होता. आपला मुलगा आयकर अधिकारी झाल्याची बातमी मिळताच पालकांना इतका आनंद झाला की त्यांनी आपल्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांसाठी पार्टी केली. तसेच घरी पूजा आयोजित केली.

रितेशकडे आलिशान कार अन् त्यावर आयकर अधिकाऱ्याची नेम प्लेट होती. त्याला ऑफिसर बनून लोकांमध्ये दबदबा निर्माण करण्याची मोठी आवड होती. मात्र तब्बल आठ महिन्यांनंतर मंगळवारी पोलिसांनी या तरुणाला तपासणीदरम्यान पकडून त्याचा पर्दाफाश केला. यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. त्याने प्रथम बनावट ओळखपत्र दाखवून पोलिसांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या कडकपणापुढे तो बळी गेला. बुधवारी चौकशीअंती त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणपूरचे पोलीस अधीक्षक अभिषेक पांडे मंगळवारी रात्री उशिरा पोलिस पथकासह तपासणी करत होते. यावेळी कल्याणपूरकडून आयकर विभागाची प्लेट असलेली काळ्या रंगाची कार येताना दिसली. पोलिसांनी थांबवल्यानंतर महावीरपुरमचा रहिवासी रितेश शर्मा कारमधून उतरला आणि आयकर अधिकारी असल्याचे भासवू लागला. त्याने बनावट ओळखपत्र पोलिसांना दाखवले. (UP news)

मात्र चौकशीदरम्यान पोलिसांना संशय आला. पोलिसांनी रितेशला कोणत्या पोस्टवर आहात विचारले असता तो अस्वस्थ झाला. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली. पोलिसांनी सांगितले, रितेश शर्मा आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून परिसरात प्रभाव वाढवत असे. मात्र, आजपर्यंत बनावट आय-कार्डद्वारे फसवणूक झाल्याचे समोर आलेले नाही. त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. रितेशच्या आठ महिन्यांच्या खात्याची माहितीही गोळा केली जात आहे.

रितेशच्या कारवर मोठ्या लाल पाटीवर आयकर विभाग असे लिहिले होते. सहसा अधिकारी अशा पाट्या लावत नाहीत, त्यामुळे संशय आल्यास त्याला थांबवण्यात आले. चौकशीदरम्यान रितेशने सांगितले की, आठ महिन्यांपूर्वी त्याने त्याचे फर्निचर कॉन्ट्रॅक्टर वडील राजेंद्र नाथ शर्मा यांना आयकर विभागात अधिकारी म्हणून नोकरी मिळण्याची माहिती दिली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT