Rakesh Tikait Team eSakal
देश

शेतकरी आंदोलन मागे घेणार का? राकेश टिकैत यांनी स्पष्ट केली भूमिका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधानीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकरी संघटनांची बैठक आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आज शेतकरी आंदोलन (Farmer Agitation) मागे घेणार का? अशी चर्चा होती. पण, आता शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer Leader Rakesh Tikait) यांनी शेतकरी आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

शेतकरी आंदोलन मागे घेणार का? -

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे रद्द केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, सरकार संसदेत कायदे रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतली होता. आता सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी कायदे मागे घेतले. त्यानंतर आता शेतकरी आंदोलन मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याबाबतच राकेश टिकैत यांनी उत्तर दिले आहे. ''आजची बैठक ही फक्त शेतकरी संघटनांमध्ये आहे. येत्या ४ डिसेंबरला संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्यापही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम राहतील'', असं टिकैत म्हणाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, 32 पैकी सुमारे 20-22 संघटनांचं आंदोलन मागे घेण्यावर एकमत झालं. तर सुमारे 8-10 संघटना उर्वरित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, पंजाबचे जोगिंदर सिंह उग्राहान आणि हरियाणाचे सरवन सिंह पंढेर गुरनाम चधुनी यांसारखे मोठे शेतकरी नेते संप सुरु ठेवण्याच्या बाजूने आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवर त्यांच्या संघटनेचे शेतकरी मोठ्या संख्येने ठाण मांडून आहेत. आता राकेश टिकैत यांनी देखील शेतकरी आंदोलन सुरूच राहणार असं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT