FARMER wearing dhoti 
देश

Denied Entry In Dhoti: धोतर घातल्याने शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; राज्य सरकारने दिला दणका

कार्तिक पुजारी

Bengaluru News: बेंगळुरुमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. धोतर घातल्यामुळे एका ७० वर्षीय शेतकऱ्याला एका मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. याप्रकरणी कर्नाटकातील अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर कर्नाटक सरकारने मॉल प्रशासनला दणका दिला आहे. सात दिवस मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्नाटकाच्या नगर विकास मंत्रालयाने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.

धोतर घातल्याने मॉलमध्ये प्रवेश नाकारला असल्याने वादाला तोंड फुटले होते. एखाद्याचा त्याच्या कपड्यावरून किंवा पंरपरेवरून भेदभाव करणे चुकीचे आहे अशी भावना लोकांमध्ये उमटली होती. शेतकऱ्यासोबत बेंगळुरुच्या जीटी मॉलमध्ये हा प्रकार घडला होता. अनेकांसाठी हा चीड आणणारा प्रकार होता. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच तापला.

१६ जुलै रोजी फकिराप्पा आपल्या मुलासोबत जीटी मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा धोतर घातल्यामुळे त्यांच्यासोबत भेदभाव करण्यात आला. त्यांना कपडे बदलून येण्यास सांगण्यात आले. सुरक्षा रक्षकाने त्यांना शेवटपर्यंत आतामध्ये जाऊ दिलं नाही. फकिराप्पाच्या मुलाने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

कर्नाटक सरकार याची दखल घ्यावी लागली. वाद निर्माण झाल्यानंतर जीटी मॉल प्रशासनाकडून माफीनामा जाहीर करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकाने देखील माफी मागितली आहे. पण, व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. सामाजिक कार्यकर्त्यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता.

कर्नाटक सरकारने जीटी मॉलवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सात दिवस मॉल बंद ठेवावा लागेल. यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचण्यासारख्या आहेत. अनेकांनी आपल्या स्वत:चा अनुभव शेअर केला आहे. मॉल कायम स्वरूपी बंद करण्यात यावा असं देखील काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT