देश

आम्ही जातो आमुच्या गावा...सिंघू बॉर्डरवरून शेतकरी माघारी!

ओमकार वाबळे

वर्षभरापासून दिल्लीच्या सिमांवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाची(Farmers Protest) सांगता दोन दिवसांपूर्वी झाली. मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांनी तीन कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली. यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही (Winter session 2021)पहिल्याच दिवशी कायदे मागे घेण्याची कायदेशीर प्रकिया पार पडली.

यानंतर एमएसपीच्या (MSP) मुद्द्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं. मात्र, त्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी पत्र लिहून आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन संपवण्याचा मार्ग धरला. जवळपास वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर असणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी आज सामान गुंडाळत आपल्या गावी माघारी जाण्यासाठी तयारी सुरू केली. त्यामुळे पंजाब, हरयाणा या प्रांतातून आलेल्या शेतकऱ्यांची सकाळपासूनच गावी जाण्याची लगबग सुरू आहे.

येत्या १५ डिसेंबरला संयुक्त किसान मोर्चा (Sanyukt Kisan Morcha) अधिकृतपणे त्यांची भूमिका जाहीर करणार आहे. मात्र, त्याआधी शेतकऱ्यांनी परतीचे मार्ग धरले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या सिमेवरील आंदोलन वर्षभरानंतर संपल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांचा मोठा गट उद्या सकाळी ८ वाजता जागा रिकामी करेल. आजच्या मीटिंगमध्ये, आम्ही बोलू, प्रार्थना करू आणि ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांच्या भेटीगाठी घेऊ, असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं. लोकांनी आधीच जागा सोडण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेला 4-5 दिवस लागतील. मी १५ डिसेंबरला निघणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या प्रमुखांनी दिली. टिकैत यांनी गाझीपूर बॉर्डरवर पत्रकारांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT