Shahdol News sakal
देश

Shahdol News: मृत्यूनंतरही यातना! मध्यप्रदेशातील धक्कदायक घटना, मोटारसायकलवरून मुलीचा मृतदेह घेऊन गेला बाप...

13 वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनी मुलीचा मृतदेह दुचाकीवर ठेवून सुमारे 70 किलोमीटरचे अंतर कापले होते.

सकाळ डिजिटल टीम

माणुसकीला काळीमा फासणारी घटना जिल्हा रुग्णालयात समोर आली आहे. 13 वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनी मुलीचा मृतदेह दुचाकीवर ठेवून सुमारे 70 किलोमीटरचे अंतर कापले होते. हॉस्पिटलमध्ये त्याला ऍम्ब्युलन्स नाही मिळाली.

ही बाब कळताच शहडोलचे जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वडिलांना एक ऍम्ब्युलन्स उपलब्ध दिली. मात्र, आजही आदिवासीबहुल शहडोल विभागात ही एक सामान्य समस्या आहे. कधी खाट, कधी दुचाकी, कधी रिक्षा तर कधी मृतदेह हातात घेऊन जाण्याच्या घटना समोर येत असतात.

शहडोल जिल्ह्यातील बुधर ब्लॉकमधील कोटा गावातील लक्ष्मण सिंग गौर यांनी त्यांची १३ वर्षांची मुलगी माधुरी गोड हिला १२ मे रोजी उपचारासाठी शहडोलच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. माधुरीला सिकलसेल आजाराने ग्रासले होते.

जिल्हा रुग्णालयात दोन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते मात्र माधुरीचा जीव वाचू शकला नाही. माधुरीच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी मृतदेह घरी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मदत मिळाली नाही.

वडिलांनी जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाकडे ऍम्ब्युलन्सची मागणी केली असता १५ किमीपेक्षा जास्त अंतरावर ऍम्ब्युलन्स मिळणार नाही, असे उत्तर मिळाले. तुम्हाला स्वतःची व्यवस्था करावी लागेल. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नातेवाइकांना खासगी ऍम्ब्युलन्सचा खर्च परवडत नव्हता. त्यामुळे त्यांनी मृतदेह दुचाकीवर बसवून घरी नेण्याचा निर्णय घेतला.

मृतदेह मोटारसायकलवर ठेवून नातेवाईक घराकडे निघाले. शहडोल शहराच्या मध्यातून मृतदेह मोटारसायकलवरून नेल्याची माहिती जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांना मिळाली. जिल्हाधिकार्‍यांनी नातेवाइकांपर्यंत पोहोचून सिव्हिल सर्जनला मृतदेह तातडीने पाठविण्याच्या सूचना दिल्या. सामाजिक कार्यकर्त्याने पीडितेच्या नातेवाईकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था करून त्यांना गावी पाठवले. जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदतही केली.

आदिवासीबहुल शहडोल जिल्ह्य़ात असे प्रकार येत्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. प्रत्येक वेळी गदारोळ झाल्यानंतर प्रशासनही यंत्रणा दुरुस्त करण्याचा दावा करते, मात्र असहाय्य गरिबांना ऍम्ब्युलन्सची सुविधा मिळत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT