देश

माणूसकी हरवली? मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापानं शोधली वाट

नामदेव कुंभार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहा:कार माजवला आहे. त्यातच आरोग्य व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्यामुळे भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीतच पंजाबमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर माणूसकी हरवली आहे का? असाच प्रश्न उपस्थित होतो. एक वृद्ध बाप मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहे. त्या वृद्ध बापाच्या मदतीला कुणीही धावलं नाही. हे भयावह चित्र पाहून मन सून्न होतेय.

जालंधर येथील रामनगर परिसरातील मन सुन्न करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वृद्ध बाप आपल्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन रस्त्यानं जात असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयानं मृतदेह पॅक करुन दिला. वृद्द बापाकडे मुलाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते. रुग्णवाहिकाही मिळाली नाही. त्यामुळे वृद्ध बापाने आपल्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन स्मशानात चालत जाण्याचा निर्णय घेतला.

वृद्ध बाप मृतदेह घेऊन चालत जात असताना कुणीही मदतीसाठी धावलं नाही. जालंधरमध्ये जवळपास 500 रुग्णालयं आणि 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका आहेत. तसेच अनेक एनजीओ आणि सोशल वर्करही आहेत. इतकेच काय, रस्त्यानं जाणाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. पण या वृद्ध बापाच्या मदतीसाठी एकही जण पुढे आलं नाही. या घटनेनंतर माणुसकी खरेच जिवंत आहे का? असा प्रश्न पडतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT