आज फादर्स डे. प्रत्येकजण आपापल्या वडिलांना काहीतरी गिफ्ट देण्याचा प्रयत्न करत असतो तर काहीजण भावूक पत्र लिहून आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असतात. तसंच निलंबित पोलिस अधिकारी संजीव भट्ट यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी भावनिक पत्र लिहिले आहे. संजीव भट्ट हे सध्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्यांना ३३ वर्षापूर्वी झालेल्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना निलंबित करून गुजरातमधील जामनगर कोर्टाने २०१९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती तेव्हापासून ते तुरूंगात आहेत.
(Fathers Day Post For Sanjeev Bhatt)
आज फादर्स डेच्या निमित्ताने त्यांचे मुले आकाशी आणि शंतनू यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी आपल्या वडिलांसोबतचे जुने फोटो शेअर करत त्यांच्या फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की,
आम्ही आकाशी आणि शंतनू भट्ट,
"प्रिय बाबा....
आज फादर्स डे आहे. आज सगळं जग फादर्स डे साजरा करतं पण आमच्यासाठी प्रत्येक दिवस खूप अभिमानाचा आणि सन्मानाचाआहे आणि राहील कारण तुम्ही आमचे वडील आहात !
गेल्या 4 वर्षांतील प्रत्येक सेकंदाला फाडून टाकल्यासारखे वाटत आहे. अजून एक वर्ष उलटून गेले तरीही आम्ही तुम्हाला घट्ट धरून राहू शकत नाही तरीही या अन्यायी शासनाविरुद्ध न्यायासाठी आमचा लढा सुरूच आहे."अशी भावनिक पोस्ट आकाशी आणि शंतनू भट्ट यांनी आपल्या वडिलांना उद्देशून केली आहे.
"तुम्ही आमची शान आहात, आमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तुम्ही आहात, तुम्हीच आमचा आत्मा, अस्तित्व, ताकद आणि सर्वकाही तुम्हीच आहात..." असं लिहित त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "तुम्ही एक परिपूर्ण माणसाची व्याख्या आहात. जो माणून एक धाडसी प्रामाणिक अधिकारी आहे, द्वेष आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या हजारो लोकांचा आवाज आहे, सत्य आणि सचोटीचा माणूस जो येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणा आहे तो माणूस आपला बाप आहे याचा आम्हाला पूर्ण सन्मान आणि अभिमान आहे.
ही एक लढाई आहे, ती आम्ही जिंकूच याची मला खात्री आहे! पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला पत्र लिहिणार नाही... कारण पुढच्या वर्षी यावेळी तुम्ही आमच्या सोबत असाल असा विश्वास आम्ही तुम्हाला देत आहोत. शब्द कधीही प्रेमाची जागा घेऊ शकत नाहीत, फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा...
- एका अत्यंत बलवान पित्याची मुले!
असं पत्र लिहून संजीव भट्ट यांच्या मुलांनी त्यांच्या भावनांना वाट करून दिली आहे. दरम्यान संजीव भट्ट हे सध्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्यांची मुले त्यांना सोडवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.