नवी दिल्ली : भारताचे सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचं हेलिकॉप्टर तमिळनाडूमध्ये कोसळले (Amry Helicopter Crashed Tamil Nadu) आहे. यामध्ये एकूण १४ जण बसलेले होते. यामध्ये सीडीएस बीपिन रावत हे जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे क्रॅश झालेले हेलिकॉप्टर Mi-17V5 आहे. त्याचेच वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेणार आहोत.
Mi-17V-5 हे रशियन बनावटीचे लष्करी वाहतूक हेलिकॉप्टर आहे जे कर्मचारी, माल आणि उपकरणे वाहून नेण्यासाठी बनविण्यात आले आहेत. तसेच हे हेलिकॉप्टर संरक्षण मंत्री, सीडीएस यांसारख्या लष्करातील खास लोकांसाठी वापरलं जातं. त्यात एक बाह्य गोफण बसवलेले असून त्याद्वारे बाहेरूनही मालवाहतूक केली जाऊ शकते. जमिनीवरील लक्ष्य नष्ट करणे आणि जखमींना वाहून नेणे तसेच रॉकेट देखील या हेलिकॉप्टरने वाहून नेता येते. हे दोन इंजिन असलेले हेलिकॉप्टर असून सर्वात सुरक्षित आहे.
रशियन शस्त्रास्त्र पुरवठादार Rosoboronexport च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये कॉकपिट आणि स्वरक्षणार्थ यंत्रणा बसवण्यात आली आहे. हे रॉकेट, तोफ आणि शस्त्र देखील वाहून नेऊ शकते. Mi-17V-5 हे लष्करामधील सर्वात मोठं आणि अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले हेलिकॉप्टर आहे. तसेच हे हेलिकॉप्टर कुठल्याही भौगोलिक स्थिती आणि दिवसा किंवा रात्री अतिशय प्रतिकूल हवामानात चालवता चालवता येतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.