dark lipstick  
देश

काय सांगता! महापौरांसारखी गडद रंगाची लिपस्टिक लावल्याने महिला कर्मचाऱ्याची बदली; काय आहे प्रकरण?

Women Chopdar of Brihan Chennai Municipal Corporation News: महापालिकेत दोन वर्षांपूर्वी चोपदारपदी नियुक्ती झालेल्या माधवी या पहिल्या महिला कर्मचारी आहेत. त्यावेळी त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती. आता पुन्हा लिपस्टिकवरून त्या चर्चेत आल्या आहेत.

कार्तिक पुजारी

चेन्नई- बृहन चेन्नई महापालिकेतील महिला चोपदार एस.बी.माधवी (वय ५०) यांची बदली करण्यात आली आहे. महापौर आर. प्रिया यांच्यासारखीच गडद रंगाची लिपस्टिक लावल्याच्या कारणावरून त्यांची बदली करण्यात आली आहे. प्रिया या तमिळनाडूतील सत्ताधीश द्रमुक पक्षातील आहेत. महापालिकेत दोन वर्षांपूर्वी चोपदारपदी नियुक्ती झालेल्या माधवी या पहिल्या महिला कर्मचारी आहेत. त्यावेळी त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती. आता पुन्हा लिपस्टिकवरून त्या चर्चेत आल्या आहेत.

गडद रंगाची लिपस्टिक लावल्यामुळे महापौरांच्या कार्यालयातून त्यांची बदली करण्यात आली आहे. महापौरांपुढे चालत जात त्यांच्या आगमनाची घोषणा करण्याचे काम माधवी यांचे होते. पुरुष चोपदार हा पांढरा शर्ट-पँट, कंबरेला लाल पट्टा आणि लाल फेटा अशा गणवेशात असतो. माधवी पांढरा चुडीदार आणि खांद्यावर लाल रंगातील बॅच अशा गणवेशात असतात.

लिपस्टिक लावायची आवड माधवी यांना लहानपणापासून आहे. त्यामुळे कामावर असतानाही त्या लिपस्टिक लावून येत असत. पण महापौरांप्रमाणे गडद रंगाची लिपस्टिक लावल्याने वाद निर्माण झाला, असा दावा माधवी यांनी केला आहे.

महापौर प्रिया यांनाही लिपस्टिक लावायची सवय आहे. आपली चोपदारही लिपस्टिक लावून येते, हे त्यांना आवडले नाही. पण महापौर लावतात, तशी गडद रंगाची लिपस्टिक लावल्याने त्यांनी कारवाई केल्याचे, माधवी यांचे म्हणणे आहे.महिला दिनानिमित्त महापालिकेत झालेल्या 'फॅशन शो' च्या वेळी महापौरांच्या स्वीय सहाय्यकांनी माधवीला गणवेशाऐवजी रंगीबेरंगी पोशाखात येण्यास सांगितले होते. मात्र लिपस्टिक न लावण्याची सूचना केली होती.

लिपस्टिक लावल्याबद्दल ही शिक्षा आहे. मी चार वर्षे चोपदार म्हणून काम केले. बृहन चेन्नई महानगरपालिकेतील गेली ११ वर्षे प्रशासकीय कर्मचारी म्हणून काम केले. परंतु लिपस्टिक किंवा फॅन्सी साड्या नेसण्यावर कधीही कोणी आक्षेप घेतला नव्हता, असं एस. बी. माधवी म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT