नवी दिल्ली : सोशल मीडिया प्रभावक (social media influencer) बॉबी कटारिया याच्यावर दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा स्पाईसजेटच्या विमानात सिगारेट ओढतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण कटारिया यानं आपल्यावरील आरोप फेटाळले असून आपल्या व्हिडिओतील विमान हे डमी विमान असल्याचं त्यानं म्हटलं आहे. (FIR registered against social media influencer Bobby Kataria connection with smoking on SpiceJet flight)
सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बॉबी कटारियाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बॉबीच्या मित्रानं त्याच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये बॉबी विमानातील सीटवर पहूडलेला आहे, त्याच्या तोंडात शिलगावलेली एक सिगारेट असून त्याचे तो झुरके घेत आहे.
याप्रकरणी स्पाईसजेटनं स्पष्टीकरण देताना म्हटलं की, या प्रकरणाची चौकशी सन २०२२ मध्ये झाली. जेव्हा हा व्हिडिओ पहिल्यांदा समोर आल्यानंतर गुरुग्रामच्या उद्योग विहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, बॉबी कटारियावर फेब्रुवारी २०२२मध्ये कारवाई करताना विमान कंपनीनं त्याला १५ दिवसांसाठी नो फ्लाईंग लिस्टमध्ये टाकलं होतं.
दरम्यान, स्वतःची बाजू मांडताना कटारियानं म्हटलं की, माझा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो जुना व्हिडिओ असून दुबईत शूट केलेला आहे. ज्या विमानात मी सिगारेट ओढताना दिसतो आहे ते खरं विमान नाही तर ते डमी विमान आहे. आम्ही शुटिंगसाठी ते तयार केलं होतं. मला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे की, अशा प्रकारे मी विमानात सिगारेट कसा ओढू शकतो? हे स्कॅनरमध्ये लगेच दिसून आलं असतं. यामध्ये सिगारेट तोंडामध्ये असली तरी ती पेटवलेली नाही. हा व्हिडिओ आम्ही सन २०१९ वा २०२० मध्ये चित्रित केला होता.
पोलिसांचं म्हणणं काय?
पोलिसांनी गुन्हा दाखल करताना या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये समोर आलंय की, बलविंदर ऊर्फ बॉबी कटारिया यानं दुबईहून दिल्लीसाठी स्पाईसजेटच्या विमानानं प्रवास केला होता. याच वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या या प्रवासादरम्यान ही घटना घडली आहे. त्यानंतर स्पाईसजेटनं देखील बॉबीवर प्रवासास बंदी घातली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.