Sariska Tiger Sanctuary esakal
देश

राजस्थानच्या जंगलात भीषण आग; 150 हेक्टर जंगल जळून खाक

सकाळ डिजिटल टीम

अलवर जिल्ह्यातील सरिस्का व्याघ्र अभयारण्यामध्ये भीषण आग लागलीय.

राजस्थानच्या (Rajasthan) अलवर जिल्ह्यातील सरिस्का व्याघ्र अभयारण्यात (Sariska Tiger Sanctuary) गेल्या 36 तासांपासून लागलेल्या आगीमुळं परिसरात खळबळ उडालीय. आग सतत भीषण रूप धारण करत आहे. जंगल आणि आजूबाजूचा 10 किमीचा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याचं सांगण्यात येतंय. तर, दुसरीकडं आगीवर नियंत्रण न मिळामुळं वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, आग विझवण्यासाठी अधिकारी सातत्यानं प्रयत्न करत आहेत.

सोमवारी आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टर (Helicopter) आणि एरियल लिफ्ट फायर ब्रिगेडचीही मदत घेण्यात आली होती. त्यानंतर आज (मंगळवार) सकाळी हेलिकॉप्टरद्वारे परिसराची पाहणी करण्यात आलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगीनं रौद्र रुप धारण केलं असून जंगलातील प्राणी जीव वाचवण्यासाठी शहरांकडं धावताना दिसत आहेत. आता हेलिकॉप्टरच्या मदतीनं एअरलिफ्टिंगद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सरिस्का आणि अलवरच्या तीन रेंजमधील कर्मचारी आणि ग्रामस्थांसह 200 हून अधिक लोक आग विझवण्यात गुंतले आहेत.

150 हेक्टर जंगल जळून खाक

या घटनेची माहिती देताना नायब तहसीलदार खेमचंद सैनी यांनी सांगितलं की, आज (मंगळवार) सकाळपर्यंत आग 10 किलोमीटरहून अधिक परिसरात पसरलीय. तर, दुसरीकडं बालेटा पृथ्वीपुरा नाका येथील डोंगराला रविवारी आग लागली, त्यानंतर रविवारी रात्री आठ वाजल्यापासून वनकर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू होतं. मात्र, अद्यापपर्यंत आग आटोक्यात आलेली नाहीय. सरिस्का डीएफओ सुदर्शन शर्मा म्हणाले, डोंगराळ भागामुळं विभागातील लोकांना वर चढताना खूप अडचणी येत आहेत. या आगीमुळं सुमारे 150 हेक्टर जंगल नष्ट झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT