Fire control training to be given by NDRF three teams will guided February 6 sakal
देश

NDRF : ‘एनडीआरएफ’ देणार वणवा नियंत्रित करण्याचे प्रशिक्षण

पहिल्यांदाच पुढाकार ; तीन तुकड्यांना येत्या सहा फेब्रुवारीपासून मुकाबल्याचे मार्गदर्शन करणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जंगलातील वणव्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होते. जंगलात नैसर्गिक व मनुष्यनिर्मित कारणांमुळे लागणारे वणवे आटोक्यात आणून नुकसान कमी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने(एनडीआरएफ) पहिल्यांदाच आपल्या जवानांना सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात विविध आपत्तींचा मुकाबला करण्यात ‘एनडीआरएफ’ची भूमिका महत्त्वाची आहे. ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्यांना येत्या सहा फेब्रुवारीपासून जंगलातील वणवे आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक अतुल कारवाल यांनी दलाच्या १८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यावेळी उपस्थित होते.

कारवाल म्हणाले, की या प्रशिक्षणासाठी एनडीआरएफ पर्यावरण व वन मंत्रालयाशी सातत्याने संपर्क ठेवून आहे. भविष्यात देशात एनडीआरएफसाठी आणखी आठ प्रादेशिक प्रतिसाद दलांचीही (आरआरसी) स्थापना केली जाईल. ही केंद्रे म्हणजे अशी ठिकाणे आहेत, जिथे विविध राज्यांत भौतिक स्थानांनुसार एनडीआरएफची छोटी दले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

‘एनडीआरएफ’ हे आपत्तींचा सामना करण्यासाठी बनविलेले विशेष दल असूनही दलातील जवानांना जंगलातील वणवे आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण दिले जात नसल्याबद्दल गेल्या वर्षी संसदीय समितीने चिंता व्यक्त केली होती.

जगभरात जंगलातील वणव्यांचे प्रमाण वाढत आहे. या वणव्यांमुळे केवळ जंगलातील साधनसंपत्तींचेच नुकसान होत नाही, तर जैवविविधताही धोक्यात येते. त्याचप्रमाणे, हवामान बदलालाही हे वणवे कारणीभूत असून आदिवासींच्या उपजीविकेवरही परिणाम होत आहे.

जंगलातील वनस्पती व पशुपक्ष्यांनाही मोठ्या संकटातून जावे लागते, असेही समितीने म्हटले होते. देशात जंगलातील वणव्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन एनडीआरएफकडून सामना केल्या जाणाऱ्या आपत्तींच्या यादीत वणव्यांचा तत्काळ समावेश करण्याची शिफारसही संसदीय समितीने केली होती.

वन खाते आपल्या मर्यादित क्षमतेसह जंगलांतील वणव्यांचा सामना करू शकत नाही. त्यामुळे, या आपत्तींचा अधिक प्रशिक्षित दलाकडून सामना करणे, ही काळाची गरज आहे. यासंदर्भातील माहिती दिली जाण्याची इच्छाही समितीने व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर समितीकडून जवानांना जंगलातील वणवे नियंत्रणात आणण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्यांत तुकड्यांना जागा

उत्तराखंडमधील हल्दवानीत एनडीआरएफच्या तुकडीसाठी ६० ते ६५ एकर जागा मिळाली असून चेन्नईतही आरआरसीठी जागा मिळाली असून आसाममध्ये गेल्या १६ वर्षांपासून तैनात असलेल्या एनडीआरएफच्या पहिल्या तुकडीसाठी जागा देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे, असेही कारवाल म्हणाले.

एनडीआरएफची वैशिष्ट्ये

  • स्थापना - २००६

  • एकूण तुकड्या - १६

  • एकूण जवान - १८,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT