First Lady Coal Engineer : आपल्या देशात काही क्षेत्र आजही अशी आहेत की, जिथे केवळ पुरूषांचे वर्चस्व आहे. त्या क्षेत्रात महिलांना काम करण्यास बंदी आहे. आज फायर ब्रिगेड, लोको पायलट या क्षेत्रातही महिला काम करत आहेत. असे चित्र असताना कोळशाच्या खाणीत काम करण्याचा पराक्रम एक तरूणीने केला आहे. आज जाणून घेऊयात तिची कहाणी.
झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशाचा काही भाग आणि मध्य प्रदेश-बिहारचा काही भाग कोळशाच्या खाणींसाठी ओळखला जातो. जेव्हा कोळसा खाणींची चर्चा होते तेव्हा आपल्याला अनेक चित्रपट आठवतात. जून्या काळातील चित्रपटात कोळशाच्या खाणी दाखवल्या जायच्या. ते पडद्यवर पाहुणच त्याची भयानकता लक्षात यायची.
चित्रपटात किंवा खऱ्या आयुष्यात खाणीत केवळ पुरूषच मजूर दाखवले गेले आहेत. कारण खाणीत उतरणे सोपे नाही. इथे केवळ अंधार असतो. पुरूष मजूरही इथे जीव धोक्यात घालून काम करतात. पण झारखंडमधील एका तरूणीने स्वत:च या जोखमीची निवड करीअर म्हणून केली आहे. हे करीअर निवडून ती देशातील पहिली महिला अंडरग्राऊंड कोळसा खाण इंजीनिअर बनली आहे. या धाडसाने आणि उत्कटतेने आकांक्षा या तरूणीला संपूर्ण जगात एक नवी ओळख मिळवून दिली आहे.
जगावेगळे धाडस करणाऱ्या या तरूणीचे नाव आकांक्षा कुमारी असून ती मूळची हजारीबाग, झारखंडची आहे. झारखंड ही कोळशाच्या खाणींची भूमी आहे. देशात सर्वात जास्त कोळसा खाणी आहेत. आकांक्षाचे बालपणही हजारीबागच्या कोळसा खाण परिसरात गेले आहे.
खाणींमध्ये सहसा फक्त पुरुष मजूर काम करतात. महिला मजूर खाणीबाहेर काम करतात. त्यामुळेच ती खाण कशी आहे याची उत्सुकता तीला होती. पण, तिला प्रवेश दिला गेला नाही. अखेर खाण पाहण्यासाठीच तिने आपण त्या खाणीत काम करायला जायचे, हे मनाशी पक्के केले.
आकांक्षाच्या या विचाराची अनेकांनी खिल्ली उडवली. काहींनी तर हे काम मूली करत नाहीत. त्यामूळे तू हा विचार सोडून दे असेही सांगितले. मात्र आकांक्षाला तिच्या घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आकांक्षाने कोळसा इंजीनिअरींगमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
माझ्या वडिलांनी करिअर निवडण्याचा निर्णय माझ्यावर सोडला होता. ते मला म्हणाले की, तू एक धाडसी मुलगी आहेस आणि तू तुझे निर्णय घेऊ शकतेस. घेतलेले निर्णय योग्य सिद्ध करण्याची ताकद तुझ्यात आहे. त्यामुळे जगाचा विचार करू नको, असा सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला. त्यामूळेच मी या माझ्या निर्णयावर ठाम राहू शकले, असे आकांक्षाने सांगितले.
आकांक्षाने बिरसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धनबाद येथून शिक्षण पूर्ण केले. 2018 मध्ये तीला हिंदुस्तान झिंक लिमिटेड, उदयपूरमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूवद्वारे तिचे सिलेक्शन झाले. तिने त्या दोन वर्षात कोळसा खण अभियंता म्हणून काम केले. जिथे आकांक्षा ड्रिलिंग विभागात काम करत होती. यादरम्यान त्याला कोळसा खाणीत जाण्याची संधी मिळाली.
जेव्हा मी पहिल्यांदा कोळशाच्या खाणीत उतरले तेव्हा तिथे काळाकूट्ट अंधार पडला होता. त्या जमीनीत खोल गेल्यावर थोड्या लाईट दिसू लागल्या. त्या लाईटच्या झगमगाटात कोळशाची खाण आतून खूप सुंदर दिसत होत. ती सोन्यासारखी चमकत होती, असे आकांक्षा म्हणाली.
कोळशाच्या खाणीत ऑक्सिजनची कमतरता भासते. तिथे सतत तहान लागते. घाम आणि आधांर यांच्याशी जणू तूम्हाला जुळवून घ्यावे लागते. हे सगळे वातावरण तूम्हाला लगेचच त्यातून बाहेर पडून जमीनीवर यावे असे वाटते. पण हे सगळे वातावरण मला भितीदायक वाटले नाही. याचे उत्तर माझ्याकडेही नाही. मी उत्सुक होते तिथे जायला, काम करायला कदाचित यामूळेच मला तिथे काम करण्याची इच्छा निर्माण झाली.
कोळसा खाण क्षेत्रात सामान्यतः पुरुषांचे वर्चस्व असते. मजुरांपासून ते कंत्राटदार, कर्मचारी, अभियंता, व्यवस्थापक येथे काम करणारे सर्व पुरुष आहेत. त्यामूळे एक महिला असल्याने अनेकवेळा मला अपमानित करण्याचा प्रयत्नही झाला होता. अनेकजण मला खाणीत जाण्यापासून रोखायचे. महत्त्वाचे काम देण्यास टाळायचे. महिलांनी तिकडे जाऊ नये, असे ते म्हणायचे. पण, मी कधीही कोणाचे बोलणे मनावर घेतले नाही. या गोष्टीला एक आव्हान समजून मी खाणीत उतरायचे आणि बारा बारा तास काम करायचे.
काही वर्षांनंतर आकांक्षाने कोल इंडियाच्या उपकंपनी सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड म्हणजेच सीसीएलसाठी अर्ज केला. जिथे अनेक मुलाखती पार केल्यानंतर आकांक्षाची अंडरग्राऊंड खाण अभियंता म्हणून नियुक्त झाली. यासह ती देशातील पहिली महिला भूमिगत कोळसा खाण अभियंता ठरली.
खाणीतील धोक्यांविषयी आकांक्षा सांगते की, पूर्वी अंडरग्राऊंड खाणीत मुख्य काम कोळसा फोडणे, मिळालेला कोळसा काढणे असे होते. पण आता तंत्रज्ञान बदलले आहे. एक अभियंता म्हणून आम्ही खाणीतील खांबाची रचना, रचना, भिंतीची स्थिरता यावर काम करतो.
पुढे ती म्हणते की, खाणीत काम करण्याचे स्वप्न फार कमी मुली पाहतील. खूप कमी मुलींना पृथ्वीच्या भुगर्भात जाण्याची उत्सुकता आहे. पण, मुलींनी याक्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीनेही पाहिले तर यात अनेक संधी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.