उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात सिल्क्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्याने त्यात अडकलेल्या ४१ मजुरांना वाचवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांची पहिला व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये बोगद्यात अडकलेले कामगार सुरक्षा हेल्मेट घातलेले दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना पहिल्यांदा गरम अन्न पाठवण्यात आले आहे. (Marathi Tajya Batmya)
बोगद्याच्या आत एक कॅमेरा पाठवण्यात आला होता, या कॅमेरा फुटेजमध्ये अडकलेले सर्व कामगार एकत्र दिसत आहेत. यावेळी कामगारांशी वॉकीटॉकीवर चर्चाही झाली. 41 कामगार एका आठवड्यापेक्षा जास्त काळ बोगद्यात अडकले आहेत. रेस्क्यू टीम त्यांना अद्याप वाचवू शकलेली नाही. जास्त ढिगारा आणि वरून माती साचल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, सोमवारी (20 नोव्हेंबर) नवीन 6 इंची पाईपलाईन या मजुरांना अन्न आहार पोहोचविण्यात यश आले.(Latest Marathi News)
बचाव पथकाने या पाईपद्वारे या कामगारांना बाटल्यांमध्ये गरम खिचडी पाठवली आहे. इतके दिवस योग्य आहार न मिळाल्याने ते अशक्त झाले आहेत. हेमंत नावाच्या स्वयंपाक्याने बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांसाठी खिचडी तयार केली. त्यांनी सांगितले की, कामगारांना गरम अन्न पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ही घटना 12 नोव्हेंबर रोजी घडली
ब्रह्मखल-यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन 4.5 किमी लांबीच्या सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग 12 नोव्हेंबर रोजी खचला होता. चारधाम प्रकल्पांतर्गत ब्रह्मखल आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव दरम्यान हा बोगदा बांधला जात आहे. 12 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता हा अपघात झाला. बोगद्याच्या प्रवेश बिंदूपासून 200 मीटरच्या आत 60 मीटरपर्यंत माती खचली. 41 मजूर आत अडकले.
बचाव कार्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीचे काय म्हणणे आहे?
बचाव मोहिमेचे प्रभारी कर्नल दीपक पाटील यांनी सांगितले की, या पर्यायी लाईफलाइनद्वारे आम्ही बोगद्याच्या आत अन्न, मोबाइल आणि चार्जर पाठवू शकतो.
खिचडी, केळी आणि सफरचंद खाण्यासाठी पाठवले जात आहेत
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना खायला काय पाठवले जात आहे? त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, कामगारांची स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांच्या मदतीने एक तक्ता तयार केला आहे. आम्ही केळी, सफरचंद, खिचडी आणि लापशी रुंद तोंडाच्या प्लास्टिकच्या दंडगोलाकार बाटल्यांमध्ये पाठवत आहोत.
बचाव कार्यासाठी तयार केले नवीन धोरण
बचाव कार्यासाठी टीमने नवीन रणनीती बनवली आहे. या अंतर्गत, NHIDCL, ONGC, THDCIL, RVNL, BRO, NDRF, SDRF, PWD आणि ITBP या आठ एजन्सी एकाच वेळी पाच बाजूंनी बोगदा खोदत आहेत.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.