Five acquitted including Ram Rahim High Court verdict in former manager ranjit singh murder case Sakal
देश

राम रहीमसह पाच जण दोषमुक्त; माजी व्यवस्थापकाच्या हत्याप्रकरणी उच्च न्यायालयाचा निकाल

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : डेराचे माजी व्यवस्थापक रणजित सिंह यांच्या हत्येप्रकरणात आज डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम सिंह याच्यासह पाच जणांना पंजाब आणि दिल्ली उच्च न्यायालयाने दोषमुक्त ठरविले. गुरमित राम रहीम सिंह सध्या रोहतकच्या सुनरिया तुरुंगात असून दोन शिष्यांवरील बलात्काप्रकरणी वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

२०२१ मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राम रहीम आणि अन्य आरोपींना रणजित सिंह यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविले होते आणि त्यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आजच्या सुनावणीनंतर राम रहीमचे वकील म्हणाले की, पंजाब आणि हरियानाच्या उच्च न्यायालयाने गुरमित राम रहीम सिंह यास रणजित सिंह यांच्या हत्येतून निर्दोष ठरविले.

१० जुलै २००२ रोजी हरियानाच्या कुरुक्षेत्रच्या खानपूर कोलितान गावात रणजित सिंह यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात सहभाग असल्याचा गुरमित राम रहीमवर आरोप करण्यात आला होता.

या डेराची पोलखोल करणारे एक खळबळजनक पत्र प्रसारित करण्यात रणजित सिंह यांचा सहभाग असल्याच्या कारणावरून हत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पत्रात डेरा मुख्यालयात डेराच्या नेत्याकडून महिलांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे म्हटले होते.

सप्टेंबर २००२ मध्ये रणजित सिंह यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यात सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. २००७ मध्ये सीबीआयने गुरमित राम रहीम सिंह आणि अन्य आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रानुसार, निनावी पत्र व्हायरल होण्यामागे रणजित सिंह याचा हात असावा आणि म्हणून डेराप्रमुखाने खून करण्याचा कट रचला, असे म्हटले होते.

आठ ऑक्टोबर २०२१ मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने रणजित सिंह हत्याप्रकरणी गुरमित राम रहीम सिंहला दोषी ठरवले. अन्य दोषींत कृष्ण लाल, अवतार सिंह, जसबीर सिंग, सबदिल याचा समावेश होता. शिवाय २०१९ मध्ये डेराप्रमुख आणि अन्य तीन जणांना १६ वर्षांपूर्वीच्या एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावली. तत्पूर्वी २०१७ मध्ये सीबीआय न्यायालयाने डेराप्रमुखास शोषणप्रकरणी दोषी ठरवले आणि २० वर्षाची शिक्षा सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Suraj Chavan Winning Amount: सुरज ठरला 'BB Marathi 5'चा विजेता; बक्षीस म्हणून मिळाली 'इतकी' रक्कम; आणखी काय काय मिळणार?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

IND vs PAK: भारताला धक्का! पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला, पण कर्णधार हरमनप्रीतला दुखापत

SCROLL FOR NEXT