Flooding In Delhi 3 Students Dead 
देश

JNU मधील पीएचडी..IAS होण्याचं स्वप्न सगळंच भंगलं; प्रशासनात जाऊ पाहणारे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे बळी!

Flooding In Delhi 3 UPSC Students Dead: आयएसएस होण्याचं स्वप्न बाळगून प्रशासनात जाऊन काही करू पाहणाऱ्या या मुलांना प्रशासनाच्या नाकर्तेपणाला बळी पडावं लागलं असंच म्हणावं लागेल.

कार्तिक पुजारी

दिल्ली- राजेंद्र नगरमध्ये असलेल्या राव आयएएस स्टडी सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने मोठी दुर्घटना घडली. दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे बेसमेंटमध्ये अचानक पाणी भरलं. यात बुडून दोन मुलींसह एका तरुणाचा मृत्यू झाला. तिघेही यूपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी होते. आयएसएस होण्याचं स्वप्न बाळगून प्रशासनात जाऊन काही करू पाहणाऱ्या या मुलांना प्रशासनाच्या नाकर्तेपणाला बळी पडावं लागलं असंच म्हणावं लागेल.

विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता मॅजेस्ट्रिकल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पण, यामुळे काही विद्यार्थ्यांचा जीव परत येणार नाही. मुळात अशी परिस्थिती कशी निर्माण झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेसमेंटमध्ये पाणी कसं शिरलं हा मूळ प्रश्न आहे. राव आयएएस स्टडी सेंटरच्या मालकाने याची खबरदारी घेतली नव्हती का? असा प्रश्न निर्माण होतो.

दाव्यानुसार, नालेसफाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे मुसधळार पावसाचे पाणी नाल्यातून वाहून जाऊ शकलं नाही अन् पाणी बेसमेंटमध्ये साचण्यास सुरुवात झाली. पाणी इतक्या गतीने बेसमेंटमध्ये भरलं की सर्व विद्यार्थ्यांना बाहेर निघायला देखील वेळ मिळाला नाही. माहितीनुसार, ३५ विद्यार्थी बेसमेंटमध्ये अडकले होते. यातील तीन विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यास वेळ मिळाला नाही. शिवाय, पाण्याचे प्रेशर देखील जास्त होते.

विद्यार्थ्यांनी पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचवण्याचा देखील प्रयत्न केला, पण त्यांना शक्य झालं नाही. त्यांनी दोरी पाण्यात टाकली जेणेकरून विद्यार्थी दोरीला पकडून बाहेर येतील. पण, पाणी खूप गढूळ होतं, त्यामुळे पाण्यातील काही दिसत नव्हतं. एनडीआरएफ टीमला प्राचारण करण्यात आले होते, पण त्याला उशीर झाला होता. दोन विद्यार्थींनीचे मृतदेह आधी बाहेर काढण्यात आले, त्यानंतर एक विद्यार्थ्याचा मृतदेह हाती लागला.

विद्यार्थ्यांची ओळख झाली आहे

विद्यार्थ्यांचे मृतदेह पोस्टमार्टमाठी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. यात ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तो केरळचा रहिवासी आहे. त्याचं नाव नेविन डाल्विन असल्याचं कळतंय. तो आठ महिन्यांपासून यूपीएससीची तयारी करत होता. याशिवाय तो दिल्लीच्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू युनव्हर्लिटीमध्ये पीएचडी करत होता. तो दररोज सकाळी लायब्रेरीत यायचा आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा.

तान्या सोनी (वय २५) आणि श्रेया यादव ( वय २५) या दोन मुलांचा जीव गेला आहे. श्रेया जून महिन्यात कोचिंग सेंटरला आली होती. ती यूपीच्या आंबेडकरनगरची रहिवासी होती. दोघींचं प्रशासकीय सेवेत येण्याचं स्वप्न होतं. दरम्यान, सदर घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. याप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT