Tripura official suspended:
आगरतळा: प्राणिसंग्रहालयातील सिंह आणि सिंहिणीचे अनुक्रमे अकबर आणि सीता असे नामकरण करण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्रिपुरा सरकारने शनिवारी राज्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन) प्रवीण लाल अग्रवाल यांना निलंबित केले. ही नावे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषद (VHP) कडून कलकत्ता उच्च न्यायालयात केलेल्या तक्रारीनंतर हे निलंबन करण्यात आले.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार , सिंह आणि सिंहिणीला प्राण्यांच्या देवाणघेवाण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 12 फेब्रुवारी रोजी त्रिपुराच्या सिपाहिजाला प्राणीसंग्रहालयातून सिलीगुडी येथील उत्तर बंगाल वन्य प्राणी उद्यानात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, नावांवरून वाद सुरू झाला.
प्रवीण लाल अग्रवाल, 1994 च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. ते त्रिपुराचे मुख्य वन्यजीव वॉर्डन म्हणून कार्यरत होते. सिलीगुडीला पाठवताना त्यांनी अकबर आणि सीता या सिंह जोडप्यांची नावे डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंदवली. मात्र यावरुन वाद निर्माण झाला. यानंचर 21 फेब्रुवारी रोजी कोलकाता उच्च न्यायालयाच्या जलपाईगुडी सर्किट बेंचमध्ये VHP च्या बंगाल युनिटने एक जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सिंह जोडीची नावे बदलण्याचे आदेश दिले.
बंगाल वनविभागाने स्पष्ट केले की ही नावे त्रिपुराने दिली आहेत आणि कोणत्याही बदलाची जबाबदारी त्रिपुरा प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांची आहे. नंतर VHP ने हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आणि दावा केला की ही नावे निंदनीय आहेत. न्यायालयाने देखील नामकरणावर नाराजी व्यक्त केली. VHP ची बाजू मांडणारे वकील शुभंकर दत्ता म्हणाले की, हे प्रकरण लवकरच हायकोर्टाच्या नियमित खंडपीठासमोर येईल. (Latest Marathi News)
प्रत्युत्तरात, त्रिपुरा सरकारने अग्रवाल यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले, ज्यांनी सिंह जोडप्याला सीता आणि अकबर असे नाव देण्यास नकार दिला. ही नावे त्रिपुरा वन्यजीव अधिकाऱ्यांनी प्राण्यांच्या देवाणघेवाणी कार्यक्रमादरम्यान दिली होती, त्यामुळे अग्रवाल यांचे निलंबन करण्यात आले, असे तपासात उघड झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.