Sushil Kumar Modi Cancer Esakal
देश

Sushil Kumar Modi: बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला! सुशील कुमार मोदी यांचं निधन

Amit Ujagare (अमित उजागरे)

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं दीर्घ आजारानं सोमवारी निधन झालं. बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी ट्विट करुन ही बातमी दिली आहे. सुशील कुमार यांच्या निधनामुळं बिहारमधील भाजपचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Former Bihar Deputy CM Sushil Kumar Modi passes away tweets Vijay Kumar Sinha Bihar Dy CM)

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते विजयकुमार सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटलं, "भाजपचे वरिष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आता आपल्यात राहिले नाहीत. संपूर्ण भाजप परिवारासह माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी ही मोठी हानी आहे. आपल्या संघटन कौशल्यासह प्रशासकीय समज आणि सामाजिक राजकीय विषयांवर आपल्या सखोल माहितीसाठी ते कायम लक्षात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देओ तसेच या शोकप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना ताकद देवो"

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील ट्विट करुन सुशील कुमार मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, विद्यार्थी परिषदेपासून आत्तापर्यंत आम्ही संघटनेसाठी काम केलं. सुशील कुमार मोदी यांचं संपूर्ण आयुष्य बिहारसाठी समर्पित राहिलं. बिहारला जंगलराजमधून बाहेर काढत विकासाच्या मार्गावर आणण्यात सुशील कुमार मोदी यांचं योगदान महत्वाचं होतं. त्यांचं नसणं हे आता भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मोठी हानी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT