Ranjan Gogoi 
देश

माजी CJI रंजन गोगोईंनी पहिल्यांदाच केलं राज्यसभेत भाषण; 4 महिला खासदारांनी केलं वॉकआऊट

खासदार असलेल्या रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज पहिल्यांदाच राज्यसभेत भाषण केलं. पण ते जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांना एका विचित्र परिस्थितीला समोरं जावं लागलं.

गोगोई भाषणासाठी उठले आणि सभागृहातील ४ महिला खासदार थेट सभागृहातून बाहेर निघून गेल्या. त्याचं कारणही समोर आलं आहे, ते म्हणजे MeToo चळवळी दरम्यान रंजन गोगोई हे चर्चेत आले होते. (Former CJI Ranjan Gogoi addresses Rajya Sabha for first time 4 women MPs did walkout)

रंजन गोगोई हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते, त्यांनीच आपल्या कारकीर्दीत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या प्रश्नावर निकाल देत राम मंदिराचा मार्ग मोकळा केला होता.

दरम्यान, तत्पूर्वी देशभरात महिला अत्याचारासंबंधीच्या MeToo चळवळीनं भारतात जोर धरला होता. यामध्ये अनेक महिलांनी आपल्यावर ओढवलेल्या पण अद्याप उघड न केलेल्या लैंगिक अत्याचारांची माहिती उघड केली होती.

यामध्ये सन २०१९ मध्ये रंजन गोगोईंवरही त्यांच्या आधीच्या कार्यालयातील एका महिलेनं लैंगिक छाळाचे आरोप केले होते. सरन्यायाधीशांवरील अशा आरोपांमुळं देशभरात मोठा गजहब माजला होता. यानंतर गोगोई सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आणि त्यांना राष्ट्रपती नियुक्त उमेदवार म्हणून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला.

पण खासदार बनल्यानंतर आज पहिल्यांदाच ते राज्यसभेत बोलले. त्यांच्यापूर्वी महिलेवर लैंगिक शोषणाचे आरोप झालेले असल्यानं राज्यसभेतील महिला खासदार जया बच्चन (सपा), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि शुश्मिता देव (तृणमूल काँग्रेस) यांनी त्यांचा निषेध म्हणून सभागृहातून काढता पाय घेतला.

गोगोईंना मिळाली होती क्लीनचीट

लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर गोगोईंनी आपल्यावरील आरोप नाकारले होते. तसेच एप्रिल 2019 मध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान गोगोई यांनी दावा केला होता की, "ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत त्यांना भारताच्या सरन्यायाधीशांचे कार्यालय निष्क्रिय करायचं आहे कारण मी पुढील आठवड्यात संवेदनशील प्रकरणांवर सुनावणी करत आहे.

न्यायपालिकेचं स्वातंत्र्य अत्यंत धोक्यात आहे,” नंतर या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीला गोगोईंवरील आरोपांत कोणतंही तथ्य सापडलं नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT