Sonia Gandhi PM narendra Modi  sakal
देश

Letter To PM: 'तुमचे परंपरेकडे लक्ष नाही'; सोनिया गांधींनी PM मोदींना लिहिलेल्या पत्रावरुन भाजपचा पलटवार

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यावरुन विविध तर्क लावले जात आहेत. यासंदर्भात सोनिया गांधी यांनी सरकारला विचारणा केली होती. यावर भाजपचे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद दोषी यांनी प्रत्युत्तर दिलंय. (Former Congress chief Sonia Gandhi nine point letter on the special session of parliament )

केंद्र सरकारने १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरपर्यंत विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यावरुन सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अधिवेशन बोलावण्याची काय गरज पडली, अशी विचारणा करताना त्यांनी ९ मुद्दे सरकारसमोर मांडले आहेत. प्रल्हाद दोषी यांनी पलटवार केला असून सोनिया गांधी यांना परंपरेची माहिती नसेल असं ते म्हणाले आहेत.

केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले असले तरी याचा हेतू सरकारने जाहीर केलेला नाही. त्यामुळे सरकारने अधिवेशन कोणत्या कारणासाठी बोलावले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विरोधकांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत. सरकारने अधिवेशनाचा अजेंडा जाहीर न केल्याने सोनिया गांधी यांनी शंका उपस्थित केली असून चर्चेची मागणी केली आहे.

प्रल्हाद जोशी यावर म्हणाले की, 'परंपरेला पाळून संसदेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. कदाचीत तुम्ही परंपरेकडे लक्ष देत नाही. संसदेचे अधिवेशन बोलावण्यापूर्वी राजकीय पक्षांसोबत चर्चा केली जात नाही, किंवा मुद्द्यावर चर्चा केली जात नाही. राष्ट्रपतींकडून अधिवेशन बोलावण्यात आल्यानंतर आणि अधिवेशन होण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होते आणि त्यात मुद्द्यांची चर्चा होते.'

सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून ९ मुद्दे उपस्थित केले होते. संसदेचे बोलावण्यात आलेले अधिवेशन, राज्य आणि केंद्रातील संबंध, जमातवाद, मणिपूर विषय आणि चीनसोबत असणारा सीमा विवाद यासारख्या विषयांचा त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे. केंद्र सरकार संविधानातून इंडिया शब्द वगळणार असल्याची शक्यता आहे. तसेच एक देश एक निवडणूक राबवण्याच्या संकल्पनेबाबतही काही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT