Former Congress minister Rajendra Bahuguna commits suicide Former Congress minister Rajendra Bahuguna commits suicide
देश

सुनेच्या आरोपानंतर काँग्रेसच्या माजी मंत्र्याने केली आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंडचे माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा (Rajendra Bahuguna) यांच्यावर तीन दिवसांपूर्वी सुनेने नातीनवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यामुळे ते दुखी झाले होते. आरोपांमुळे दुखी झाल्यानंतर राजेंद्र बहुगुणा यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (commits suicide) केली. काँग्रेसचे नेते बहुगुणा यांनी हल्द्वानीमध्ये ओव्हरहेड टाकीवर चढून स्वत:वर गोळी झाडली. (Former Congress minister Rajendra Bahuguna commits suicide)

बहुगुणा यांनी स्वतः ११२ नंबरवर पोलिसांना कॉल केला आणि सांगितले की ते टाकीच्या वर चढले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी लाऊडस्पीकरच्या साहाय्याने बहुगुणा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, माजी मंत्री आपण निर्दोष असल्याचे पोलिसांना सांगत राहिले. यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (commits suicide) केली, असे नैनितालचे एसएसपी पंकज भट्ट यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

स्वतःच्या छातीत गोळी झाडल्यानंतर बहुगुणा यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र बहुगुणा यांची सून, समधी आणि शेजारी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र बहुगुणा यांचा मुलगा अजय याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

३१ ऑक्टोबर रोजी होणार होते निवृत्त

राजेंद्र बहुगुणा (Rajendra Bahuguna) आजीवन काँग्रेसशी (Congress) संबंधित होते. त्यांनी रोडवेज असोसिएशनसह इतर अनेक संघटनांमध्ये उच्च पदांवर काम केले. हळदवणी आगाराच्या कार्यशाळेत ते वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. ते ३१ ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार होते, हे विशेष...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT